annasaheb patil loan Scheme : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना नेमकी आहे तरी काय ? कसा कराल अर्ज ?

annasaheb patil loan Scheme : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना नेमकी आहे तरी काय ? कसा कराल अर्ज ?
annasaheb patil loan Scheme
annasaheb patil loan Scheme

APEDC म्हणजेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात ‘अण्णासाहेब पाटील कर्ज योजना २०२४ जाहीर करण्यात आली. राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत नागरिकांना कर्ज स्वरूपात आर्थिक मदत मिळवुन देता यावी, जेणेकरून त्यांना स्वतःचा व्यवसाय करता येईल या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे. सदर योजनेच्या मदतीने राज्यातील बेरोजगार, अस्थिर नागरिकांना सामोरे जावे लागणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. परंतु योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. इतरही पात्रता निकष आपण पुढे जाणून घेणार आहोतच.(annasaheb patil loan Scheme)

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे मुख्य उदिष्ट्ये :

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करून रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य देण्यात आलेल्याना कर्जाची रक्कम परत देण्याकरिता ५ वर्षांचा कालावधी दिला जाणार आहे. (annasaheb patil loan Scheme)

( योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता निकष असलेल्या सर्व अर्जदारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देणे आणि अर्ज भरणे आवश्यक असेल.)

योजनेचा लाभ घेण्यासाठी हे असणार पात्रता निकष :

annasaheb patil loan Scheme

सदर योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा मूळ नागरिक असणे आवश्यक असेल.

पुरुष अर्जदारांकरिता आवश्यक असलेली वयोमर्यादा ५० वर्षे आहे, तर महिलांकरिता ५५ वर्षे आहे.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ८ लाखा पेक्षा कमी असावे.

योजनेअंतर्गत कर्जाचे प्रकार :
  • वैयक्तिक कर्ज व्याज परतफेड योजना
  • गट कर्ज व्याज परतफेड योजना
  • गट प्रकल्प कर्ज योजना

( अर्ज करताना तुम्ही कर्ज घेण्यासाठी ‘वैयक्तिक कर्ज व्याज परतफेड योजना’ पर्याय निवडावा.)

योजनेसाठी ही आवश्यक कागदपत्रे तुमच्या जवळ असायला हवी.

अर्जदाराचे आधार कार्ड
पॅन कार्ड
मोबाईल नंबर
वीज बिल
पत्ता पुरावा
ई मेल आयडी
प्रकल्प अहवाल (फॉर्म)
सेल्फ डिक्लिरेशन ( फॉर्म)

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत कर्जाची मुदत किती आहे?

योजनेंतर्गत कर्जाचा कालावधी ५ वर्ष ठेवण्यात आला आहे.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत निवडलेल्या अर्जदारांना किती कर्ज दिले जावे?

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत निवडलेल्या अर्जदारांना १० लाख रुपयांपर्यंतचे  कर्ज दिले जाईल.

योजनेचे फायदे :

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य प्रदान करून करण्यास सहाय्य करते.

योजनेच्या माध्यमातून अर्जदारांना १० लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल.

योजने द्वारे बेरोजगार नागरिक स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात ज्यामुळे इतरांना सुद्धा रोजगाराच्या संधी मिळू शकतात.

अर्जदारांना योजनेंतर्गत कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी पुरेशी ५ वर्षे मिळतात.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी असा करा अर्ज :

ज्या अर्जदारांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यांना अधिकृत उद्योग महस्वयम वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करता येईल.

लॉगिन केल्या नंतर अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर पोहोचल्यावर अर्जदाराने आता ‘नोंदणी करा’ या पर्यायावर क्लिक करावे.

आता तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, त्याठिकाणी तुम्हाला नाव, जन्मतारीख, लिंग, आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर यासह सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.

सर्व माहिती अचूक भरल्यानंतर अर्जदाराने पुढील पर्यायावर क्लिक करावे.

पुढील पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल.

आता नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त केलेला OTP तिथे प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

आता इतर सर्व माहिती तसेंच त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता सबमिट बटनावर क्लीक करून अर्ज सादर करा .

महत्त्वाच्या लिंक्स :

annasaheb patil loan Scheme

शासन निर्णय (GR Pdf) :  येथे क्लिक करा 

वेबसाईट लिंक : udyog.mahaswayam.gov.in

सेल्फ डिक्लिरेशन फॉर्म :   येथे क्लिक करा 

प्रोजेक्ट रिपोर्ट फॉर्म  येथे क्लिक करा 

व्हाटसॲप ग्रुप :  येथे क्लीक करा 

अर्जा बाबत प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा.

फोन नंबर : 1800-120-8040

हेही वाचा : Agristack Yojana : ॲग्रीस्टेक योजना नेमकी आहे तरी काय ? त्याचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ? वाचा सविस्तर माहिती इथे..

Lakhpati Didi Yojana Maharashtra : लखपती दीदी योजना म्हणजे काय ?

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment