Captain 200 DI Mini Tractor : 20 एचपीचा मिनी ट्रॅक्टर कमी शेती क्षेत्रासाठी ठरेल वरदान ! शेतीची कामे होतील कमी खर्चात..
शेती क्षेत्रात ट्रॅक्टर चे महत्त्व काय आहे , हे एक शेतकरीच चांगल्या प्रकारे सांगू शकतो. ट्रॅक्टर शेतातील बऱ्याच प्रकारच्या कामांकरिता अतिशय उपयुक्त असे यंत्र असून अगदी शेतीची पूर्व मशागती पासून तर पिके काढणीपर्यंतची सर्वाधिक कामे ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचे अवजारांच्या माध्यमातून पार पाडता येतात. ट्रॅक्टरचा वापरामुळे शेतीची कित्येक अवघड कामे आता अतिशय सोप्या पद्धतीने करता येत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांचे श्रम सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. तसेच कमीत कमी वेळेत ट्रॅक्टरच्या मदतीने कामे करणे शक्य झाले आहे.
Captain 200 DI Mini Tractor
ट्रॅक्टरचे महत्त्व आपल्याला ठाऊक आहेच, परंतु अनेक शेतकऱी बांधवांकडे कमी शेतजमिन असते. यामुळे त्यांना मोठा ट्रॅक्टर खरेदी करणे आर्थिक दृष्टया परवडत नाही. अशावेळी कमी क्षेत्र असलेले शेतकरी मिनी ट्रॅक्टरला प्राधान्य देतात . सध्या ट्रॅक्टर बाजारपेठेत अनेक कंपन्यांचे उत्कृष्ट दर्जाचे मिनी ट्रॅक्टर बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण कोणता ट्रॅक्टर निवडावा असा बऱ्याचदा शेतकऱ्यांना पडतो. तर आजच्या लेखात आपण अशाच एका लोकप्रिय मिनी ट्रॅक्टर बद्दल माहिती घेणार आहोत.(Captain 200 DI Mini Tractor )
तसे पाहायला गेले तर, कॅप्टन ट्रॅक्टर हा भारतीय शेतकऱ्यांमधील एक विश्वसनीय असा ब्रँड बनला आहे. कॅप्टन कंपनीने अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञान वापरून उत्कृष्ट अशा वैशिष्ट्यांसह जबरदस्त ट्रॅक्टर तयार केले आहेत. यापैकी सध्या जास्त करून कॅप्टन ट्रॅक्टर हे इंधन कार्यक्षम तंत्रज्ञान आणि इंजिनसह उपलब्ध आहेत. यामुळे, शेतकऱ्यांना कमी इंधनांमध्ये देखील शेतीची जास्तीची कामे सहजपणे करता येत आहेत. तर तुम्ही देखील शेतकरी असाल ? आणि शेतीसाठी तुम्ही देखील मिनी ट्रॅक्टर घेण्याच्या विचारात असाल तर ‘ कॅप्टन 200 डीआय’ या मिनी ट्रॅक्टरचा विचार करायला हरकत नाही.
कॅप्टन 200 डीआय मिनी ट्रॅक्टरचे वैशिष्ट्ये :
Captain 200 DI Mini Tractor
कॅप्टन 200 डीआय मिनी ट्रॅक्टरच्या वैशिष्टया बद्दल बोलायचे झाले तर, या ट्रॅक्टरमध्ये 895 सीसी क्षमतेच्या सिंगल सिलेंडर मध्ये वॉटर कुल्ड इंजिन बसवण्यात आले आहे. जे की, 20 अश्वशक्ती जनरेट करते.
हा मिनी ट्रॅक्टर वेट टाईप एअर फिल्टर सह येतो व त्यामुळे इंजिनचा धुळीपासून बचाव होण्यास मदत होते.
मिनी ट्रॅक्टरची कमाल पीटीओ पावर 17 एचपीची आहे. ज्यामुळे हा ट्रॅक्टर जवळपास सर्व ट्रॅक्टर चलित शेती अवजारे सहजरीत्या चालवू शकतो.
कॅप्टन ट्रॅक्टरचे इंजिन 2300 आरपीएम जनरेट करते.
19 लिटर क्षमतेची इंधन टाकी या ट्रॅक्टरमध्ये देण्यात आलेली असून याची हायड्रोलिक क्षमता 600 किलो इतकी ठेवण्यात आलेली आहे.
याचा अर्थ शेतकऱ्यांना एकावेळी जास्त मालाची देखील वाहतूक करणे शक्य होते.
या ट्रॅक्टरचे एकूण वजन 885 किलो असून त्याचा व्हीलबेस 1500 मिमी आहे.
या मिनी ट्रॅक्टरमध्ये मेकॅनिकल/ पावर( पर्यायी) स्टेरिंग देण्यात आलेले आहे. यामुळे शेतात तसेच खडबडीत रस्त्यावर आरामशीर ड्राईव्ह करता येते.
हा ट्रॅक्टर आठ फॉरवर्ड + दोन रिव्हर्स गिअर सह गिअरबॉक्ससह येतो. तसेंच हा मिनी ट्रॅक्टर सिंगल क्लच आणि सिंक्रोमेश प्रकारच्या ट्रान्समिशनसह येतो.
कॅप्टन कंपनीने या मिनी ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 28 किमी प्रतितास दिला आहे. तसेच यामध्ये मल्टी स्पीड पीटीओ प्रकारचा पावर टेकऑफ सुद्धा देण्यात आलाय. जो 540 आरपीएम जनरेट करतो.(Captain 200 DI Mini Tractor)
किंमत आणि मिळणारी वारंटी?
भारतीय बाजारपेठेमध्ये या मिनी ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत ही 3 लाख 29 हजार रुपये ते 3 लाख 39 हजार रुपये अशी आहे. आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्सनुसार या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत काही राज्यांत बदलू शकते. या मिनी ट्रॅक्टर 700 तास किंवा एक वर्षाची वारंटी कंपनीने दिलेली आहे.(Captain 200 DI Mini Tractor)
तर मित्रांनो ही माहिती आवडल्यास पुढे नक्की शेअर करा. आणि असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाटसॲप ग्रुपचे सदस्य व्हा. येथे क्लिक करा
हेही वाचा: दुध व्यवसाय आणि शेतीसाठी वाहन खरेदी करताय ? तर हे नक्की वाचा
annasaheb patil loan Scheme : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना नेमकी आहे तरी काय ? कसा कराल अर्ज ?