North Western Railway Bharti 2024 : उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये एकूण 1791 जागांसाठी भरती , लगेंच करा अर्ज !
North Western Railway Bharti 2024 : रेल्वे मध्ये नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु बऱ्याचदा त्यांच्या पर्यंत भरतीची जाहिरात पोहचतच नसल्याने ते संधी गमावून बसतात. त्यामुळेच आपण प्रभात मराठीच्या माध्यमातून नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट नियमित पाहत असतो. तर आजच्या या लेखात सुद्धा आपण नोकरी संदर्भातील एक नवी अपडेट पाहणार आहोत. नुकतीच उत्तर पश्चिम रेल्वे विभागांतर्गत १७९१ रिक्त जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती बद्दल तपशीलवार माहिती.
North Western Railway Bharti 2024
उत्तर पश्चिम रेल्वे विभाग
पदाचे नाव : अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
एकूण रिक्त जागा : १७९१ जागा भरल्या जाणार.
शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल. यासोबतच ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.
(अधिक माहितीसाठी जाहिरात pdf वाचा)
अर्ज शुल्क : Gen/OBC : रु.100/-फी
SC/ST/PWD/महिला : फि नाही.
वयाची अट :- १० डिसेंबर २०२४ रोजी १८ ते २४ वर्ष असावे.
(SC/ST करिता वया मध्ये ५ वर्ष सूट तर, OBC करिता ३ वर्ष सूट.)
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
शेवटची तारीख : १० डिसेंबर २०२४
एकूण जागा : १७७९
अशी असेल निवड प्रक्रिया :
North Western Railway Bharti 2024
अर्जदारांच्या दहावीच्या गुणांची टक्केवारी किमान ५०% असावी, यासोबतच ज्या ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारी करायची आहे, त्यामधील ITI गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. मॅट्रिक आणि आयटीआयमधील गुणांच्या साध्या सरासरीच्या आधारे पॅनेल असणार आहे.
मॅट्रिकच्या टक्केवारीच्या गणनेच्या उद्देशाने, उमेदवारांना सर्व विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची मोजणी करण्यात येईल.
आयटीआय गुणांच्या टक्केवारीच्या गणनेसाठी, तात्पुरत्या/अंतिम प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या गुणांची गणना करण्यात येईल.
दोन उमेदवारांना समान गुण असल्यास, अधिक वय असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
जर अर्जदारांच्या जन्मतारीख सारख्या असतील तर आधी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराचा विचार केला जाईल.
वर सांगितल्याप्रमाणे, उमेदवाराने मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने स्लॉटच्या संख्येइतके, विभाग/युनिट, iti ट्रेडनुसार आणि प्रवर्गानुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.
शेवटी नावनोंदणी केलेले उमेदवार मूळ प्रशस्तिपत्रांची पडताळणी आणि संलग्न परिशिष्ट-IV नुसार वैद्यकीय प्रमाणपत्राच्या निर्मितीच्या अधीन असतील.
ऑनलाइन अर्ज सादर करताना, प्रत्येक अर्जदाराला एक नोंदणी क्रमांक जारी केला जाईल. उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. कारण त्याची गरज पुढे लागणार आहे.
North Western Railway Bharti 2024
सूचना :
भरतीसाठी अर्ज हा दिलेल्या तारखे पर्यंत सादर करावा लागणार आहे.
दिलेल्या तारखे नंतर सादर झालेले अर्ज ग्राह्य धरले जात नाहीत.
अर्ज सादर करत्यावेळी विचारलेली सर्व माहिती अचूक भरायची आहे.
अर्ज सादर करण्याआधी भरतीची अधिकृत जाहीरात नीट वाचुन घेणे गरजेचे आहे.
(जाहीरात pdf खालील प्रमाणे देण्यात आली आहे.)
हा लेख आपल्या मित्रमंडळीं पर्यंत नक्की पाठवा आणि प्रभात मराठीच्या व्हाटसॲप ग्रुपचे सदस्य व्हा.
महत्त्वाच्या लिंक्स :
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात पीडीएफ वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
हेही वाचा: – Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज
SIDBI Recruitment 2024 : भारतीय लघु उद्योग विकास अंतर्गत नोकरीची सुवर्णं संधी, इथे करा अर्ज !
Sai Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर लगेच करा अर्ज..