Maize Crop Variety : मक्याच्या ह्या संकरित वाणांची लागवड करा आणि मिळवा भरघोस उत्पादन !

Maize Crop Variety : मक्याच्या ह्या संकरित वाणांची लागवड करा आणि मिळवा भरघोस उत्पादन !
Maize Crop Variety
Maize Crop Variety

आपण घेत असलेल्या कोणत्याही पिकातून जर का चांगले उत्पादन मिळवायचे असल्यास तर लागवडी करिता आपण जो काही वाण निवडतो तो दर्जेदार तसेंच भरघोस उत्पादन देणारा असणे गरजेचे असते. नाहीतर बऱ्याचदा आपण योग्य व्यवस्थापन करून देखील फायदा होत नाही जर तुम्ही निवडलेला वाण उत्तम दर्जाचा नसेल.

Maize Crop Variety

तर आजच्या लेखात आपण मक्याच्या अशाच एका दर्जेदार वाणा बद्दल माहिती घेणार आहोत. आपल्याला कल्पना असेलच की, खरीप व रब्बी हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते. मक्याचा वापर प्रामुख्याने पशु, पोल्ट्री खाद्य निर्मिती करणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक प्रमाणात होतो. यासोबतच सध्या इथेनॉल निर्मितीसाठी सुद्धा मक्याचा वापर होत असल्यामुळे मक्याला येणाऱ्या काळात चांगला दर मिळू शकतो.

(Maize Crop Variety)

अशी एक शक्यता आहे. सध्या देखील मक्याला चांगले दर मिळत असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत असून त्यामुळे येणाऱ्या कालावधीत मक्याच्या लागवड क्षेत्रात नक्कीच वाढ होईल अशी एक शक्यता आहे. तर मंडळी तुम्ही देखील मका लागवड करण्याच्या विचारात असाल तर या लेखात सांगितलेले काही वाण नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील.

मक्याचे भरघोस उत्पादन देणारे काही मोजके वाण पुढील प्रमाणे आहेत.

राजश्री :

राजश्री हा मक्याचा वाण एक महत्त्वाचा संकरित वाण असून याचा दाण्याचा रंग नारंगी व आकाराने मध्यम चपटा दाणा असतो. मध्यम कालावधीत परिपक्व होणारा व पानांवरील करपा रोगाला तसेच खोडकीळ व सोंड्या भुंगा यासारख्या कीटकांना प्रतिकारक्षम असा वाण आहे.खरीप व रब्बी हंगामात लागवडीकरिता उत्तम वाण असून सरासरी उत्पादन हेक्टरी ४५ ते ४८ क्विंटल पर्यंत मिळते.

करवीर( संयुक्त वाण) :

या वाणाच्या दाण्याचा रंग नारंगी असतो व आकाराने टपोरी दाणा असतो. कीड व विविध रोगांना प्रतिकारक्ष असा वाण असून खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामासाठी लागवडीस उत्तम वाण आहे. करवीर वाणापासून हेक्टरी ५२ ते ५५ क्विंटल खरिपात आणि रब्बी हंगामात ६५ ते ६८ क्विंटल हेक्टरी इतके उत्पादन मिळते.(Maize Crop Variety)

ह्यूनिस :

मक्याचा हा संकरित वाण लागवडीकरिता उपयुक्त असून याच्या दाण्यांचा रंग पिवळा असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मक्याचा हा वाण खोडकीड व तांबेरा रोगाला मध्यम प्रतिकारक असून खरीप व रब्बी हंगामात लागवडीस व आंतरपीक म्हणून देखील योग्य असा वाण आहे. या वाणाच्या लागवडीपासून सरासरी हेक्‍टरी ४५ ते ५० क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवून देतो.(Maize Crop Variety)

फुले महर्षी( संकरित वाण) :

या वाणाच्या मक्याच्या दान्याचा रंग नारंगी तसेच आकाराने मध्यम चपटा असा दाना असतो. तसेंच मध्यम कालावधीत म्हणजेच लागवडीनंतर ९० ते १०० दिवसात काढणीस तयार होतो.(Maize Crop Variety)

खोडकूज तसेच इतर रोग व खोडकिडीस प्रतिकारक्षम असा वाण असून ट्रसीकम पर्ण करपा,

पट्टेरी पर्ण व खोडकूज आणि काळी खोडकुज इत्यादी रोगास मध्यम प्रतिकारक्षम वाण असून पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असलेला वाण आहे. तसेच हा जमिनीवर लोळत नाही म्हणजे जमिनीवर आडवा पडत नाही.या वाणाची खरीपात लागवड केली तर हेक्‍टरी ७५ ते ८० क्विंटल आणि रब्बी हंगामात लागवड केल्यास ८५ ते ९० क्विंटल पर्यंत उत्पादन प्राप्त होते.

पंचगंगा (संयुक्त वाण) :

मक्याच्या या जातीचा दाण्याचा रंग पांढरा असतो व कमी कालावधीत काढणीस तयार होणारा वाण असून पानावर येणाऱ्या करपा रोगाला प्रतिकारक्षम आणि आंतरपीक म्हणून देखील लागवडिस योग्य असा वाण आहे. मिळणाऱ्या उत्पादनाचा विचार केला तर हेक्‍टरी ४५ ते ४८ क्विंटल पर्यंत सरासरी उत्पादन मिळते.

तर अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाटसॲप ग्रुपचे सदस्य व्हा.

  येथे क्लिक करा 

हेही वाचा  :-  20 एचपीचा मिनी ट्रॅक्टर कमी शेती क्षेत्रासाठी ठरेल वरदान ! शेतीची कामे होतील कमी खर्चात..

annasaheb patil loan Scheme : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना नेमकी आहे तरी काय ? कसा कराल अर्ज ?

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment