Soyabean Rate Today : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या तरी सोयाबीनची विक्री करू नये, कारण 15% ओलावा असला तरी मिळणार आहे हमीभाव..
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या तरी सोयाबीनची विक्री करू नये, कारण १५% ओलावा असला तरी मिळणार आहे हमीभाव. तर मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. कृषी क्षेत्रातील पुन्हा एकदा एक खास अपडेट आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्ही देखील सोयाबीन उत्पादक असाल तर तुमच्या सोयाबीनला या निवडणुकीनंतर योग्य आणि चांगला भाव मिळू शकतो.
कारण केंद्र शासनाने आता १५% ओलावा असलेला सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळू शकणार आहे. ज्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अद्द्याप सोयाबीन विकली नसेल तर त्यांना चांगले दिवस नक्कीच बघायला मिळणार आहेत. केंद्र शासना द्वारे जरी १५% ओलावा असला तरी ४८९२ एवढ्या हमी किमतीला सोयाबीन खरेदी करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयाने अनेक शेतकऱ्यांचा आता फायदा होणार आहे.
अनेकदा असे होते की, शेतकऱ्यांना सोयाबीनला ओलावा जास्त असल्याने कमी भाव मिळतो. परंतु आता मात्र केंद्र शासनाने घेतलेला या निर्णयामुळे व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणूकींपासुन शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.
या नवीन निर्णयाच्या माध्यमातून आता जर, सोयाबीनला १५% ओलाव असेल , तर हे सोयाबीन महाराष्ट्र शासनाचा हमीभावाचा जो दर असेल त्या दराने व्यापाऱ्याला खरेदी करावी लागणार आहेत.
दरम्यान अनेक शेतकरी बांधवानी देखील आपल्या शेतात सोयाबीनचे पिक घेतलेले असून, घरामध्ये सुद्धा सोयाबीनची मोठ्या प्रमाणात साठवणूक केल्याचे समोर आले आहे.
उत्पादन भरगोस झाले असले तरी, त्या मालाला योग्य भाव मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत होती.
यामुळेंच आता शेतकरी बांधवाना कमीत कमी १५ % ओलावा असलेल्या सोयाबीनला महाराष्ट्र शासनाचा हमीभाव मिळणार असल्याची खात्री मिळाली आहे.
तसे पाहायला गेलं तर, सध्या सोयाबीनला बराच कमी भाव मिळत असून काही व्यापारी शेतकऱ्यांची अडवणूक देखील करत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन जो व्यापारी योग्य किमत देईल त्यांनाच द्यायला हवी. सोयाबीनला यापेक्षा अधिकचा भाव मिळणार नाही, अशी अफवा सुद्धा काही व्यापारी वर्गाकडून पसरवली जात आहे. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की, सोयाबीनला आता हमीभाव मिळणार असल्याची हमी केंद्र शासनाने दिल्यामुळे सोयाबीनच्या बाजार भावामध्ये वाढ होणार आहे. याची खात्री झाली आहे. तर अशाप्रकारे तुम्ही देखील अजूनही तुमची सोयाबीन विकली नसेल तर येत्या काही दिवसांत नक्कीच तुमच्या सोयाबीनला योग्य भाव मिळू शकतो.
Kapus Soyabean News : केंद्र शासनाच्या या निर्णयाने मिळणार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा !