Sameer chougule: पत्नीच्या वाढदिवसानिमित्त समीर चौघुले यांची खास पोस्ट !
महाराष्ट्राची हास्य जत्रा हा सोनी मराठी वर प्रसारित होणारा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय झाला आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरातून देखील या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवाय यातील बऱ्याच कलाकारांना या कार्यक्रमामुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. गौरव मोरे ,वनिता खरात, ओमकार भोजने, पृथ्वीक प्रताप, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, रोहित माने अशा बऱ्याच हास्यविरांना या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळाली आहे.(Sameer chougule)
यासोबतच महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहचलेले अजून एक मोठं नाव म्हणजे समीर चौघुले .
समीर चौघुले हे अभिनयाबरोबरच हास्यजत्रेतील स्कीट चे लेखनही करतात. आत्ता पर्यंत त्यांनी बऱ्याच गाजलेल्या स्किट चे लेखन त्यांनी केले आहे. विनोदाचे अचूक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाटक, मालिका, सिनेमा यामधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आणि आत्ता महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून त्यांना एक वेगळीच ओळख मिळाली आहे.
Gaurav more: वडीलांच्या आठवणीत गौरव झाला भाऊक
ते सोशल मीडियावरही बरेच सक्रिय असतात. आज त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. समीर चौघुले यांच्या पत्नीचे नाव कविता चौघुले असे आहे.(Sameer chougule)
वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट शेअर करित आपल्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत . त्यामध्ये ते असे म्हणतात , कविता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…तू माझ्या आयुष्यात आहेस यासाठी देवाचे खूप खूप आभार…तुझ्याविना माझं सतत ‘अडणं’ असंच कायम राहू दे…खूप प्रेम तुला… अशा शुभेच्छा देत त्यांनी आपल्या पत्नी प्रति असलेले प्रेम व्यक्त केले आहे. त्यांनी या शेअर केलेल्या पोस्ट वर त्यांच्या चाहत्यांच्या तसेंच अनेक कलाकारांच्या शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.(Sameer Chougule)
(हेही वाचा prasad oak: भाऊ वडिलांना अग्नी देत होता आणि मी हास्यजत्रेच्या खुर्चीत बसून स्किट बघत होतो. )
Vishal kamble , Founder : Prabhatmarathi.com : passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi.