Boring Yojana शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत व्हावी याकरिता सरकार शेतकऱ्यांच्या शेतात बोरिंग बसवून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना योग्य असे अनुदान देखील दिले जाणार आहे.
सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांसाठी जबरदस्त योजना आखत आहे. याबरोबरंच आदित्यनाथ योगी यांनी सुद्धा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने मोफत बोरिंग योजना जाहीर केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बोरिंग बसवण्यासाठी भरघोस असे अनुदान देण्यात येईल जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना सिंचन करण्यास कसलीही अडचण येणार नाही . राज्य सरकारच्या या योजणेमुळे शेतकऱ्यांना फार मोठी मदत होईल. Boring Yojana
बोरिंग योजना नेमकी काय आहे. Boring Yojana
शेतकरी बांधवांना शेती करताना बऱ्याच अडचणी येत असतात. असेंच सिंचन करण्यासाठी देखील खूप अडचणींना सामोरे जावे लागत असते. त्यामुळें सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन, सरकारने ही योजना शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता सुरु सुरु केली आहे. जे या योजनेसाठी अर्ज करतील, त्यांना सरकारद्वारे उपकंपनी अंतर्गत बोरिंगसाठी पैसे देण्यात येतील , जर तुम्हालाही असे करायचे असेल्यास याबद्द्लची पुरेपूर माहिती आज आम्ही या लेखात देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मोफत बोअरिंग योजने करिता किती रुपयांचे अनुदान दिले जाणार? Boring Yojana
सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बोरिंग करण्याकरिता 3000 रुपयापर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. तसेच पंप संच बसवण्यासाठी 2800 रुपयांचे अनुदानही देण्यात येइल.
याबरोबरंच सर्वसाधारण प्रवर्गा मधिल अल्पभूधारक शेतकऱ्यांना बोरिंगसाठी 4,000 रुपये व पंपसेट बसवण्यासाठी 3,750 रुपये अनुदान दिले जाईल. याव्यतिरिक्त अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधवांना बोरिंग करण्यासाठी 6,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे . याबरोबरंच त्यांना पंप संच बसवायचा असल्यास 5,650 रुपयांचे अनुदान देण्यात येईल. मोफत बोरिंग योजनेसाठीची पात्रता . या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी मुळचा Up म्हणजेच उत्त्तर प्रदेश चा असणे गरजेचे आहे. अल्प व अल्प भुधारक प्रवर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर शेतीयोग्य जमीन असणे गरजेचे आहे . Boring Yojana
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत. Boring Yojana
आधार कार्ड
पॅनकार्ड
उत्पन्नाचा दाखला
खसरा खतौनीच्या प्रतीसह शेतीची कागदपत्रे
बँक खाते तपशीलाकरिता बँकच्या पासबुकची प्रत
मोबाईल नंबर जो आधारशी लिंक असेल.
कसा करावा अर्ज ? How To Apply ?
सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://minorirrigationup.gov.in
त्यानंतर मुख्यपृष्ठावर What’s New नावाचा एक विभाग दिसेल. यावर क्लिक करा , त्यानंतर तिथे अनेक पर्याय दिसतील. आपण मोफत बोरिंग योजना ऑनलाईन अर्ज वर क्लिक करावे. Boring Yojana
यातून डाउनलोड पर्यायावर क्लिक करावे .
या पर्यायावर क्लिक करताच क्षणी आपल्या समोर मोफत बोरिंग योजनेचा फॉर्म ओपन होईल.
हा फॉर्म डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढून घ्या.
त्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सगळी माहिती अचूक भरावी.
फॉर्म व्यवस्तीत भरल्यानंतरच , तो फॉर्म गट विकास अधिकारी, तहसीलदार किंवा लघु पाटबंधारे विभागाकडे जमा करावा. आणि अशा प्रकारे मोफत बोरिंग योजनेसाठी आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. Boring Yojana
Solar Pump Yojana Maharashtra 2024: आजपासून करता येणार अर्ज!
Mahadbt Tractor Subsidy: महाडीबीटी ट्रॅक्टर योजना २०२४ !