12th Result : उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल!

12th Result महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक आणि माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे . बोर्डा द्वारे बारावीच्या परीक्षांचा निकाल २१ मे म्हणजेच उद्या जाहीर केला जाणार आहे. उद्या दुपारी एक वाजता 12वी चा निकाल संकेतस्थळावर बघता येणार आहे. याबद्दलची माहिती बोर्डाकडून देण्यात आलेली आहे. 12th Result

ऑनलाइन निकाल जाहीर होण्यापुर्वी सकाळी 11 वाजता बोर्डाद्वारे पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यामध्ये विभाग निहाय निकाल जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षेकरिता राज्यातील १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. फेब्रुवारी ,मार्च २०२४ मध्ये दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या . या परीक्षांचे निकाल मे महिन्यात जाहीर केले जाण्याचं सांगण्यात आले होते. यादरम्यान बारावीचा निकाल आता, २१ मे रोजी जाहीर केला जाणार असल्याचं समोर आलं आहे .12th Result

बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन संकेतस्थळावरून निकालाची प्रिंटही काढता येईल. सर्व विषयांचा सविस्तर निकाल संकेतस्थळावर दिसेल. ऑनलाइन निकाल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, पूनर्मुल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. उत्तर पत्रिकेच्या पूनर्मुल्यांकनासाठी आधी उत्तर पत्रिकेची झेरॉक्स कॉपी बोर्डाकडून घ्यावी लागेल. त्यानंतर पाच दिवसात शुल्क भरून अर्ज करावा लागणार आहे. निकाल पाहण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन संकेतस्थळावरून निकालाची प्रिंट काढता येऊ शकते. तसेंच संकेतस्थळावरच सर्व विषयांचा सविस्तर निकाल पाहता येईल.12th RESULT

youtuber Armaan malik : दोन पत्नी , 9 मोलकरीण , 10 फ्लॅट..youtube ने बदलले आयुष्य !

Petrol Diesel price : सध्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील पेट्रोल डिझेलचे दर काय ? असे चेक करा

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment