Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply
नमस्कार मंडळी आजचा लेख हा विधवा महिलांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील विधवा महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अंतर्गतर्गत ज्या कोणी महिला विधवा आहेत, अशा महिलांना दरमहिन्याला दोन हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विधवा अर्ज ऑफलाइन पद्धतीने कसा करावा, योजनेकरिता पात्रता काय असावी तसेंच आवश्यक कागदपत्रे कोणती याबद्दल आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
योजनेची उद्दिष्ट (Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply online )
एखाद्या महिलेच्या पतीचा आकस्मित किंवा अन्य कारणास्तव मृत्यू झाल्यास महिलांना बऱ्याच कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते. पती जर कामावणारा एकच व्यक्ती असेल तर अशा परस्थित बऱ्याच आर्थिक समस्यांना विधवा महिलांना तोंड द्यावे लागते . अशातच महाराष्ट्र सरकार ने ही बाब लक्षात घेऊन, विधवा महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि बळकट करण्यासाठी तसेंच स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र महिला कल्याण विभागाकडून विधवा महिलांसाठी एक विशेष विधवा पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे.
विधवा महिलांना योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपये प्रति महिना पेन्शन स्वरूपात दिले जाणार आहेत . दर महिन्याला दोन हजार रुपये विधवा महिलांच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.यासोबतच विधवा पेन्शन योजना राज्यातील विधवा महिलांसाठी विकास महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली योजना आहे.
विधवा पेन्शन योजना, या योजनेचा मुख्य हेतू हा पतीच्या मृत्यूनंतर महिलांना समाजात उंच मान करून जगता यावे तसेंच शासनाकडून देण्यात येणाऱ्या पेन्शनमुळे कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या मूलभूत गरजा भागवता याव्या असा मुख्य उद्देश या योजनेचा आहे.
काय असणार पात्रता ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.
अर्जदाराचे बँकचे अकाउंट हे आधार कार्ड सोबत जोडलेले असावे, म्हणजेच विधवा महिलांचे बँक अकाउंट हे आधार कार्डला लिंक असणे गरजेचे आहे.
अर्जदार विधवा महिलांचे उत्पन्न हे 21 हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
अर्जदाराची वयोमर्यादा ही जास्तीत जास्त 65 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे .
(Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply online )
पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
अर्जदाराचे आधार कार्ड
गॅस कनेक्शन असल्यास ते ऍड्रेस पुरवा
वयाचा पुरावा
फोटो कॉपी
उत्पन्नाचा दाखला
बँक पासबुक (झेरॉक्स )
मोबाईल नंबर
जातीचा दाखला
पत्त्याचा पुरावा
अर्ज करण्याची प्रक्रिया (Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply online )
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया करावी !
विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी होण्याकरिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. विधवा महिला पेन्शन योजनेसाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करावा.
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी .(Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply online )
अर्जदार महिलांनी आपल्या जवळील संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जाचा नमुना घ्यावा . त्यांनंतर एप्लीकेशन फॉर्म भरून संबंधित अधिकार्याकडे सबमिट करावा.
ऑफलाईन अर्ज सबमिट करताना आवश्यक असणाऱया कागदपत्रांची पूर्तता करुन घ्यावी.
आजचा लेख आवडल्यास वर दिलेल्या व्हाट्सॲप ग्रुपचे सहभागी व्हा आणि आपल्या जवळपास असणाऱ्या गरजू विधवा महिलांना या योजने बद्दल माहिती द्या !
हेही वाचा :
Pashu Shed Yojana : शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख 60 हजार रुपयांचे अनुदान, जाणून घ्या अधिक माहिती..
Lek Ladki Yojana scheme 2024 :सरकार देणार मुलींना ₹75000 , असा करा अर्ज !
Maha Dbt Biyane Yojana 2024: बियाणे अनुदान योजना