Mazhi ladki bahin yojna 2024 Online Apply ; महिलांना मिळणार १,५०० रुपये जाणून घ्या अधिक माहिती…

Mazhi ladki bahin yojna 2024 Online Apply

नमस्कार मंडळी, नुकतेच लोकशाही निवडणुकांचे निकाल स्पष्ट होऊन नवीन सरकार स्थापन झाले आहे. शासन पुन्हा जोमाने काम करत आहे. नवनवीन बदल करत आहे सोबतच अनेक नवीन योजना राबवत आहे. अशातच शासना द्वारे नवीन योजने बाबत जीआर समोर आला आहे. महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प सादर केल्याच्यानंतर एका महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली असून ‘ माझी लाडकी बहीण योजना’ असे या योजनेचे नाव आहे.

‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यातील   महिलांना चांगलाच फायदा होणार आहे.  या योजनेद्वारे  राज्यातील महिलांना 1500 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Mazhi ladki bahin yojna 2024 Online Apply

चला तर मग जाणून घेऊयात या योजेने बद्दल सविस्तर माहिती. तर आजच्या लेखा मध्ये आपण ‘ माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ नक्की कोणत्या महिलांना मिळणार आहे , तसेंच  त्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता काय, अर्ज करत्या वेळी लागणारी कागदपत्रांची आवश्यकता, कोणते अर्जदार पात्र असतील यासोबतच कशा प्रकारे अर्ज सादर करता येणार आहे,  या बद्दलची संपूर्ण  माहिती या लेखाद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे खालील माहिती काळजी पूर्वक वाचा .

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने बद्दल थोडक्यात माहिती . Mazhi ladki bahin yojna 2024 Online Apply

Mazhi ladki bahin yojna 2024 Online Apply
Mazhi ladki bahin yojna 2024 Online Apply

 

तर मंडळी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही 28 जुन 2024 पासून संपूर्ण राज्यभरात सुरु करण्यात आली आहे. तसेंच  या योजने बद्दलची अंमलबजावणी देखील 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे. माझी लाडकी बहीण  या योजने द्वारे महाराष्ट्रातील मुली तसेंच महिला वर्गाला  1,500 रुपये देण्यात येणार आहेत.  यासाठी पात्र ठरण्याकरिता काही आवश्यक अटी आणि शर्ती देखील असणार आहेत. 

महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे याचा परिणाम त्यांच्या आर्थिक स्वतंत्र्यावर होतो, आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शासना द्वारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. 

Mazhi ladki bahin yojna 2024 Online Apply

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश .

महिलांच्या रोजगार निर्मितीस चालना देणे.

राज्यातील महिलांना आत्मनिर्भर आणि  स्वावलंबी बनवणे.

महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य तसेंच पोषक स्थिती सुधारणे

आर्थिक आणि सामाजिकतेचे पुनर्वसन करणे.

अर्ज करण्यासाठीची पात्रता – 

महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता अर्जदार महिला ह्या 21 ते 60 वयोगटातील विवाहित , विधवा, घटस्फोटीत आणि निराधार महिला या योजनेचा  लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. यासोबतच अर्जदार महिला ह्या महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेंच विवाहित, विधवा, घटस्फोटीत, आणि निराधार महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करू पाहणाऱ्या महिलांचे वय हे कमीत कमी 21 वर्षे आणि  जास्तीत जास्त 60 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे.  लाभार्थी महिलेचे बँकेत खाते असणे देखील अत्यावश्यक आहे. आणि अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न देखील 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त नसले पाहिजे.

आवश्यक कागदपत्रे –

  • अर्ज करणाऱ्या महिला उमेदवाराचे 
  • आधार कार्ड.
  • कुटुंबाचा उत्पन्न दाखला.(उत्पन्न 2.50 लाखा पेक्षा कमी असावे)
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा जन्माचा दाखला(Birth certificate).
  • बँक खाते असलेल्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स .
  • उमेदवाराचे रेशन कार्ड .
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • आणि सदर योजनेच्या अटी, शर्ती पालन करण्याबाबतचे हमीपत्र .

अर्ज करण्याची पद्धत –

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे . आणि हा अर्ज करण्यासाठी शासन  एक पोर्टल तयार करणार आहे. यासोबतच योजने बद्दलचे मोबाईल ॲप्लिकेशन सुद्धा तयार केले जाणार आहे . अन्यथा सेतू केंद्र द्वारे देखील आपल्याला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करताना अडचण येत असेल किंवा अर्ज भरण्याची प्रक्रिया जमत नसेल तर अशा महिला ग्रामपंचायत केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष जाऊनही अर्ज करता येणार आहे. अर्ज भरत्या वेळी अर्ज करणारी महिला त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित रहावे,कारण या ठिकाणी स्वतः महिलांच्या फोटो आणि केवायसी ही करणे देणार आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून अर्जदाराची पोचपावती घ्यायला विसरू नये. 

ऑनलाईल अर्ज केल्या नंतरची प्रक्रिया-

ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया झाल्यास अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार . त्यानंतर अर्जदाराची तात्पुरती यादी ही पोर्टलवर वर जारी करण्यात येइल . तसेच त्याची एक प्रत अंगणवाडी केंद्र आणि  ग्रामपंचायत अशा ठिकाणी लावण्यात येईल.

1 ऑगस्ट 2024 रोजी या ठिकाणी अंतिम यादी लावण्यात येणार आहे.

 15 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तसेंच अधिक माहितीसाठी कृपया शासन निर्णय पहावे.

कुठे उपलब्ध होणार ? मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फॉर्म…

 माझी लाडकी योजने करिता कसल्याही प्रकारच्या कागदपत्राचा फॉर्म भरण्याची गरज भासणार नाहीये. कारण या योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. आणि  अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांना फक्त आवश्यक असलेल्या कागदपत्रांची गरज लागणार आहे.  

Mazhi ladki bahin yojna 2024 Online Apply
Mazhi ladki bahin yojna 2024 Online Apply

हेही वाचा

India Post Recruitment 2024: GDS पदांसाठी 35 हजार जागांसाठी मेगा भरती सुरु..

Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply online : विधवा महिलांना मिळणार दोन हजार रुपये महिना !

LPG gas cylinder Price : 2024 व्यावसायिक सिलिंडर 30 रुपयांनी स्वस्त

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment