Aamcha Ladka Shetkari Yojana ; आमचा लाडका शेतकरी योजना राबवणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा !
बीडमध्ये 21 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या राज्य सरकारच्या कृषी महोत्सवा मध्ये केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा नव्या योजनेची घोषणा केली आहे.दरम्यान ते असेही म्हणाले की, आमच्या सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट देणे होय.
आमच्या सरकारचं एकच धोरण आहे, कष्टकरी, वारकरी सुखी शेतकरी अशा प्रकारचे आपण धोरण राबवत आहोत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेंच लाडका भाऊ योजना अशा योजनांची घोषणा केली, आणि त्या आमलात सुद्धा आणल्या. त्यानंतर आता आम्ही ‘आमचा लाडका शेतकरी योजना’ देखील सुरू करण्याच्या तयारीत आहोत. अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केली आहे.(Aamcha Ladka Shetkari Yojana)
‘आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आम्ही ऑफिसमध्ये बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाही आहोत, तर आम्ही बांधावर जातो, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
“केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे देणारे आहेत. त्यामुळे आज मी त्यांच्याआधी बोलत आहे, मी शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे काहीतरी मागणार आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.(Aamcha Ladka Shetkari Yojana)
शेतकऱ्यांचे जेव्हा नुकसान होते, त्यांच्यावर संकटं येतात ,तेव्हा तेव्हा आम्ही मदत करतो तेही सगळे नियम बाजूला ठेऊन. असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
दूध आणि कांद्याच्या प्रश्नांवर देखील घेण्यात येणार बैठक ;
एक रुपयात विमा योजना देणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे ते असेही सांगतात की, किसान सन्मान निधातून केंद्र आणि राज्यातून एक प्रकारे मोठा निधी देण्यात आला आहे. आणि आम्ही शेतकऱ्यांना दिलेलं कधीच काढत नाही. आमचे विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिल? मात्र आम्ही हे कधीही काढत नाही. आज राज्यातील शेतकरी बांधवाचे कांद्याचे आणि दुधाचे प्रश्न आम्हाला सोडवायचा आहेत. यासाठी शिवराज सिंह चौहान तुम्ही थोडा प्रयत्न करा, अशी विनंतीही एकनाथ शिंदे यांनी केली.(Aamcha Ladka Shetkari Yojana)
आमच्या शेतकरी बांधवांच्या कापसाला आणि सोयाबिनला चांगला भाव मिळायला हवा, सोयाबिनला हेक्टरी पाच हजार आणि कापसाला पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेतो आहोत. यामध्ये प्रति दोन हेक्टर पर्यंत मर्यादा असणार आहे. अशी घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
आता शिंदे सरकार कडून ‘आमचा लाडका शेतकरी योजना’ राबवली जाणार का ? आणि ती कशी असणार ? या कडे सर्वच शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.
तर मंडळी अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा.
<<< यथे क्लीक करा >>> whatsapp
हेही वाचा: Surya Ghar Yojana Maharashtra : 300 युनिटपर्यंत मोफत वीज, पीएम सूर्य घर योजना , असा करा अर्ज !