Agriculture Success : टाकून दिलेल्या कोरफडीतून सुरु केला व्यवसाय , आज रोजी करतोय 3.5 कोटींची उलाढाल !

Agriculture Success : कोरफड लागवडीतून आणि त्यातून बनवलेल्या उत्पादनातून ऋषिकेशने ३० % नफ्यासह ३.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे .
Agriculture Success
Agriculture Success

कोरफडीला सध्या जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे, कारण त्वचा आणि शरीराच्या अनेक आजारांवर वापरता येत असल्याने कोरफड भारतासोबतच परदेशात देखीलही मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.

हिच बाब ऋषिकेशनं लक्षात घेत धाडस केले
आणि कोरफड लावली. मग काय हा याच निर्णयाने त्याचं नशीब बदलुन टाकलं.

आता तो सरासरी ८ हजार लिटर कोरफडीपासून उत्पादने बनवून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे.

फेकून दिलेल्या कोरफडीतून सुचली कल्पना :

Agriculture Success

एका व्यावसायिकाने साताऱ्यातील पाडळी येथील शेतकऱ्यांना कोरफडीची लागवड करण्याची कल्पना दिली होती. ‘कोरफड वाढवा, लाखो कमवा’ अशा घोषणांचे ऋषिकेशला ढाणेला फार कुतुहल वाटले. गावातल्यांनी सुद्धा कोरफड लावली परंतु जसजशी कापणीची वेळ जवळ येऊ लागली तसा तो व्यापारी सुद्धा गायब झाला. आणि शेतकऱ्यांच्या कोरफडीला कोणीच विचारेनासे झाले. बऱ्याच जणांनी कोरफड फेकून दिली. मात्र ऋषिकेशने या शेतकऱ्यांचीच फेकून दिलेली कोरफडीची रोपे स्वत:च्या शेतात आणून लावली.(Agriculture Success)

२००७ मध्ये जेव्हा गावातील लोकांनी कोरफड टाकून दिली तेंव्हा त्याकडे टाकून दिलेल्या कोरफडीच्या रोपाकडे ऋषिकेशने संधी म्हणून पाहिले. कोरफडीपासूनच त्याने ज्यूस, साबण, शॅम्पू, अशी अनेक उत्पादने तयार केली. ऋषिकेशच्या या जिद्दीने आणि सातत्याने त्याच्या व्यवसायाने यशाची ऊंची गाठली आहे. आता त्याच्या या कामामुळे गावातील बऱ्याच तरुणांना प्रेरणा मिळत आहे.

अशाच नवनवीन माहितींसाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..       whatsapp 

हेही वाचा:  Agriculture Bussines Ideas : शेतीसोबत करता येणारे हे 3 जोडधंदे देतात नफाच नफा !

सेंद्रिय शेती म्हणजे काय ? सविस्तर माहिती वाचा इथे.

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment