Ashok Leyland : दुध व्यवसाय आणि शेतीसाठी वाहन खरेदी करताय ? तर हे नक्की वाचा…
शेती करायचे म्हटले की बऱ्याचदा मालवाहतूकीकरिता उपयोगी ठरणाऱ्या पिकअप वाहनांची गरज लागतेच. पिकअप वाहनाच्या मदतीने अनेक व्यावसायिक कामे सोप्पी होतात. यासोबतच शेतकऱ्यांसाठीही फार उपयोगी ठरते, शेतात उत्पादित होणारा शेतीमाल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याकरिता पिकअप अतिशय उपयुक्त ठरते.
सध्या दूध व्यवसायात देखील पिकअपचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो.(Ashok Leyland)
तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या दूध वाहतूक तसेच भाजीपाला व्यवसायाकरिता वस्तूंच्या वितरणासाठी चांगला आणि शक्तिशाली पिकअप खरेदी करायचा विचार करीत असाल तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. तर शक्तिशाली पिकअप पैकी एक असणारा म्हणजेच अशोक लेलँड बडा दोस्त i5 या पिकअप बद्दल तुम्ही नक्कीच विचार करू शकता. हा पर्याय शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरतो आहे. तर आजच्या लेखात आपण याच पिकअप बद्दल माहिती घेणार आहोत.
अशोक लेलँड बडा दोस्त i5 पिकअपची वैशिष्ट्ये ;
अशोक लेलँड बडा दोस्त i5 या पिकअप मध्ये 1.5- लिटर टर्बोचार्ज केलेले डिझेल इंजिन बसवण्यात आले आहे. तसेंच हे इंटरकुलर इंजिन 3 सिलेंडरमध्येच 1478 सीसी क्षमतेसह येते आणि ते ८० एचपी पावर आणि 190 एनएमचा टॉर्क जनरेट करू शकते. उत्तम दर्जाच्या एअर फिल्टरसोबत येणारी ही पिकअप इंजिनला धुळीपासून वाचवण्यास देखील मदत करते.(Ashok Leyland)
सदर पिकअप मध्ये 50 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. तसेंच पिकअपची लोडिंग क्षमता 2125 किलोग्रॅम इतकी आहे. यासोबतच चांगले मायलेज आणि कमीत कमी इंधनात जास्त वापर करण्याची सुविधा या पिकअप मध्ये आहे. तर पिकअपचा कमाल वेग हा 80 किलोमीटर प्रतितास इतका ठेवण्यात आलेला आहे.
अशोक लेलँड (Ashok Leyland)ने 5025 एमएम लांबी व 1842 एमएम रुंदी आणि 2590 एमएम व्हील बेससह 2061 एमएम उंचीमध्ये या पिकअपची रचना तयार करण्यात आलेली आहे. या पिकअपमध्ये पावर असिस्टेड,टील्टेबल कॉलम स्टेरिंग देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे अगदी खरबडीत रस्त्यावर सुद्धा तुम्हाला आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव घेता येतो. तसेंच या पिकअपमध्ये 5 फॉरवर्ड + एक रिव्हर्स गिअरसह गीअरबॉक्स बसवण्यात आला आहे.
ही पिकअप व्हेंटिलेटेड डिस्क किंवा ड्रम ब्रेक्ससह येते व यामुळे टायर्सवर मजबूत पकड ठेवणे शक्य होते.तसेच डायाफ्राम, सिंगल ड्राय प्लेट, मेकॅनिकल केबल ऑपरेटेड क्लच, मॅन्युअल टाईप ट्रान्समिशन इत्यादी वैशिष्ट्ये सुद्धा देण्यात आली आहेत.
अशोक लेलँड बडा दोस्त i5 पिकअपची किंमत ?
अशोक लेलँड बडा दोस्त i5 या पिकअपची भारतामधिल एक्स शोरूमची किंमत पाहायला गेल्यास 10 लाख 73 हजार ते 11 लाख 22 हजार रुपये इतकी आहे. शिवाय आरटीओ नोंदणी तसेंच रोड टॅक्समुळे अनेक राज्यांमधिल पिकअपच्या किमतीत बदल देखील होऊ शकतो.
हेही वाचा : – Top 40 Hp Tractors ट्रॅक्टर खरेदी करायचा आहे ? मग हे नक्की वाचा..
सोलापूर मधील हा शेतकरी दूध उत्पादनातुन वर्षाकाठी करतो 22 लाखांची उलाढाल !