Bajaj Pulsar N125 Bike : 11 हजार डाऊनपेमेंट मध्ये या दिवाळीत घरी आणा बजाज पल्सर एन 125 !
बजाज ऑटो कंपनी भारतामधील लोकप्रिय वाहन कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते.भारतीय ग्राहकांमध्ये कंपनीच्या गाड्यांना लोकप्रियता मिळाली आहे .
बजाजच्या अशाच लोकप्रिय बाईक पैकी एक म्हणजे बजाज पल्सर. देशभरातील अनेक ग्राहकांची पसंतीस उतरल्याने ही बाईक आता नवनवीन मॉडेल्स सह बाजारात उपलब्ध आहे.
दरम्यान आता दिवाळीच्या मुहूर्तावर बजाज कंपनीने २१ ऑक्टोबर रोजी २०२४ रोजी 125 सेगमेंटमध्ये बजाज पल्सर N125 हे नवीन मॉडेल दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केले आहे.
बजाज पल्सरचे अगोदरचे जे काही व्हेरियंट आहेत त्यापेक्षा या नवीन बजाज पल्सर एन 125 मध्ये जास्त फीचर्स देण्यात आलेली आहेत. तसेच अगोदर पेक्षा या नवीन पल्सरमध्ये उत्तम असा स्फोर्टी लुक देण्यात आलेला आहे.
तर मंडळी तुम्ही सुद्धा बजाजची ही नवीन पल्सर दिवाळीत आपल्या घरी आणण्याचा विचार करित असाल तर, हा लेख तुमच्यासाठी. तुम्हाला बाईक लोनच्या माध्यमातून देखील खरेदी करता येऊ शकते. परंतु लोन घेतल्यास किती इएमआय महिन्याला भरावा लागेल असा प्रश्न पडला असेल ? तर हा लेख नक्कीच तुमची मदत करू शकेल. आजच्या या लेखात आपण याच बद्दलची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
बजाज पल्सर N125 ची किंमत किती आहे ?
बजाज पल्सर एन 125 या नवीन मॉडेल असणाऱ्या बेस व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ही ९४ हजार ७०७/- रुपये एवढी आहे.
ही पल्सर बजाजने एन 125 बेस आणि टॉप अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे.
डाऊन पेमेंट ११,०००/- रुपये केल्यावर किती हप्ता येईल ?
बजाज पल्सर एन 125 खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट ११,००० /- सुद्धा करता येते, ही खरोखरच खास गोष्ट आहे. तर तुम्ही देखील ११,०००/- रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला जवळपास ९७,८४४ रुपयांचे लोन घ्यावे लागु शकते. जे की तुम्हाला ९% दराने ३ वर्षांसाकरिता दिले गेले तर तुमचा महिन्याला हप्ता हा ३,१११/- रुपयांचा येईल. तर एकंदरीत तुम्हाला ही बाईक घेण्यासाठी १,११,९९६ /- रुपये मोजावे लागतील. तीन वर्षाकरिता घेतलेल्या या कर्जाची पूर्णपणे परतफेड कराल तेव्हा तुम्हाला बाईकच्या किमतीपेक्षा एकूण १४,१५० रुपये जास्त द्यावे लागतील.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 👉 : –whatsapp.com
हेही वाचा :-Diwali Hero Bike Offer 2024 : दिवाळी निमित्त हिरोची या वाहनावर खास ऑफर !
BMW CE 02 : भारतात लॉंच झाली बीएमडब्ल्यू सीई 02 जाणून घ्या काय आहेत फिचर्स ?