Bandhkam Kamgar Yojana 2024 : राज्यातील कामगारांना मिळणार ५,००० रुपये !
नमस्कार मंडळी तर शासनातर्फे राज्यातील शेतकरी तसेंच गरजूना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी अनेक योजना राबवत असते. अशीच एक योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना. या योजनेच्या माध्यमातुन राज्यातिल कामगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ‘भारत महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यातील बांधकाम मजुरांना ही योजना अतिशय फायदेशीर ठरणार आहे कारण बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत कामगारांना आर्थिक मदत केली जाणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पोर्टल द्वारे घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यामध्ये राज्यातील प्रसिद्ध महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अधिकृत वेबसाईट आहेत. तर आजच्या लेखात आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.
महाराष्ट्र बांधकाम विभागातील सर्व कामगारांना पोर्टलच्या माध्यमातून लाभ घेता येणार आहे. पोर्टल सुद्धा शासनाने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत विशेषतः बांधकाम कामगारांसाठीच विकसित केलेले आहे. राज्यातील कष्टकरी कामगारांना 2000 रुपयांपासून 5000 रुपयापर्यंत ची आर्थिक मदत बांधकाम कामगार योजने द्वारे मिळणार आहे. कोरोना काळ उलटताच, साधारणता राज्यातील बारा लाख बांधकाम कामगारांना आर्थिक मदत करण्यात आलेली होती.
आता ज्या कामगार वर्गांना या योजनेचे लाभार्थी व्हायचे आहे. त्यांनी कामगार योजनेच्या mahabocw.in अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. आणि त्यामध्ये आपली नोंदणी करावी.
Bandhkam Kamgar Yojana 2024 : ही योजना कोणासाठी ?
बांधकाम कामगार योजनेद्वारे कामगार असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासोबतच बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगले आयुष्य जगता यावे . त्यांचे राहणीमान , जीवनमान सुधारण्यास मदत व्हावी . बांधकाम कामगार योजनेमधून कामगारांचे आर्थिक जीवन सुधारावे यासाठी राज्य शासनाने अशा प्रकारच्या योजनांचा अवलंब केलेला आहे जेणेकरून अशा प्रवर्गातील कामगारांना सुख-सोयीचे आणि समाधानाचे जीवन जगता यावे .Bandhkam Kamgar Yojana 2024
योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांच्या कामांची यादी खालीलप्रमाणे:
Bandhkam Kamgar Yojana 2024
रस्ते
इमारती
रेल्वे
सिंचन
एअर फील्ड
पाण्याचे तलाव
रेडिओ
जलाशय
धरण
बोगदे
ब्रिज
विज वितरण
दूरदर्शन
टेलिफोन
टेलिग्राफ
तटबंध
पिढी
तेल आणि वायू प्रतिष्ठापन
पाण्याची कामे
वायरलेस
जलवाहिनी
पाईपलाईन
सौर पॅनेल
टॉवर्स वायरिंग
काय असणार पात्रता : Bandhkam Kamgar Yojana 2024
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे.
अर्ज करणाऱ्या कामगारांचे वय १८ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्ज करणाऱ्या कामगारांनी किमान 90 दिवस काम केले असणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम कामगारांची नोंदणीही कामगार कल्याणकारी मंडळाने करणे गरजेचे आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
ओळख प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो
आधार कार्ड
आई प्रमाणपत्र
वय प्रमाणपत्र
शिधापत्रिका
मोबाईल नंबर
९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
असा करता येणार अर्ज ?
प्रथमता महाराष्ट्र इमारत आणि कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी . त्यानंतर वेबसाईटचे होम पेज तुमच्यासमोर उघडेले जाईल तिथे कामगार नोंदणी पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक नवीन पेज उघडेल.
त्याठिकाणी तुमची पात्रता संबंधित असणारी माहिती पेजवर टाकावी लागेल.
संपूर्ण माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तुमची पात्रता पाहण्यासाठी खाली एक पर्याय दिसेल तिथे क्लिक करावे.
क्लिक करताच तुमच्यासमोर तुमचा नोंदणी फॉर्म उघडेला जाईल. या नोंदणी फॉर्म मध्ये विचारन्यात आलेली आवश्यक सर्व माहिती काळजीपूर्वक टाकावी.
त्यानंतर ,त्यामध्ये विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे तिथे अपलोड करावी. आणि
शेवटी सबमिट बटणवर क्लिक केल्यावर तुमचा अर्ज सबमिट होईल. अशाप्रकारे तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
पोर्टल लोगिन प्रक्रिया :
सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या MAHABOCW च्या अधिकृत वेबसाईटवर जावे आणि
वेबसाईटचे होम पेजवरुनच ,लोगिन पर्यायावर क्लिक करावे.
त्याठिकाणी पेजवर विचारलेली सर्व आवश्यक माहिती म्हणजेच ईमेल आयडी आणि पासवर्ड काळजीपूर्वक टाकावा .
त्यानंतर लॉगिन पर्यायावर क्लिक करावे.
आणि अशा प्रकारे MAHABOCW या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करता येईल.
हेही वाचा :
MJPJAY GR : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना , नवीन निधी मंजूर !
Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply online : विधवा महिलांना मिळणार दोन हजार रुपये महिना !