Best Agriculture Apps : या ॲप च्या मदतीने शेती होणार सुलभ !
नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. जसे की आपल्याला कल्पना असेलच आपण प्रभात मराठीच्या माध्यमातुन नेहमीच शेतिविषयक लेख , योजना आणि नोकरी संदर्भातील मह्त्त्वाच्या अपडेट्स पाहत असतो. तर आजच्या या लेखात सुद्धा आपण शेतिविषयक नव्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत. तुम्ही देखील एक शेतकरी आहात ? तर हा लेख नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांना सुद्धा ही माहिती नक्की पोहचवा बरं का ! (Best Agriculture Apps)
मोबाईल ॲपमुळे शेती होणार सुलभ !
सध्याच्या आधुनिक जगात बऱ्याच गोष्टी इंटरनेट मुळे सोप्प्या झाल्या आहेत. त्यामुळे इंटरनेट आणि स्मार्टफोन चा वापर देखील मोठ्या प्रमाणात होतो आहे. आता प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आला आहे. हव्या त्या गोष्टी स्मार्ट फोन आणि इंटरनेट मुळे शक्य झाल्या आहेत. आणि या मध्ये शेती आणि शेतकरी सुद्धा काही मागे राहिले नाहीयेत. आपल्या शेतकरी बांधवांच्या हातात सुद्धा स्मार्ट फोन आले आहेत. परंतु तुम्हाला कल्पना आहे का ? की तुमच्या कडे असणाऱ्या स्मार्ट फोन मधील ॲपचा वापर करून तुम्ही करत असणारी शेती आणखी सुलभ आणि उत्पादकता वाढवण्यास बरीच मदत होणार आहे. तर हे कोणते आहेत हे ॲप आणी कसा करता येणार वापर , याच बद्दल आजच्या लेखात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.(Best Agriculture Apps)
हे ॲप शेतकरी बांधवांच्या मोबाईल मध्ये असायलाच हवेत !
मंडळी शेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकारण करण्यासाठी सध्या बरेच नवनवीन एप्लीकेशन प्लेस्टोर वर उपलब्ध आहेत. त्यातील काही मोजके आणि फायद्याचे ॲप आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भुजल ॲप
जसे की आपल्याला विहिरीतील,ओढ्यातील पाणी कमी होताना , आटताना लगेंच दिसते. त्यानुसार आपल्याला लगेंच काही उपाययोजना देखील करता येतात. परंतु बोअरवेल चे पाणी आपल्याला तसे दिसत नाही, त्याचा अंदाज बांधता येत नाही. बोअरवेल चे पाणी पूर्ण आटल्यावरच समजते. आणि त्यावर उपाययोजना किंवा दुसरी बोअरवेल घेई पर्यंत बरेच नुकसान देखील झालेले असते. त्यामुळेच अशा समस्या होऊ नयेत या करिता ‘भुजल ॲप’ चा वापर करता येणार आहे. ‘भुजल ॲप’ च्या मदतीने आपल्याला बोअरवेलच्या पाण्याची सध्याची परिस्थिती बघता येणार आहे. त्यामुळे वेळोवेळी पाण्याची पातळी पाहून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे नियोजन करता येणार आहे.(Best Agriculture Apps)
भुजल ॲप आपल्या स्मार्टफोन मधील प्लेस्टोअर वरून सहज डाउनलोड करता येणार आहे. शिवाय ते सुरवातीला एक महिना मोफत वापरता येते. त्यानंतर एका वर्षासाठी फक्त २०० रुपये फी म्हणून भरावे लागतात.
फुले इरिगेशन शेड्यूल्ड ॲप
आपल्या जिमिनीला , पिकांना किती पाणी द्यावे याचा अंदाज लावणे बऱ्याचदा शक्य होत नसते. शिवाय योग्य आणि गरजे पेक्षा अधिक पाणी पिकांना दिले तर मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. यावरच तोडगा असणारे ॲप म्हणजे ‘फुले इरिगेशन शेड्यूल्ड ॲप’ या ॲप द्वारे तुमचा किती एचपी चा पंप आहे शिवाय तो किती वेळ चालू ठेवला पाहिजे, इथपासुनची सर्व माहिती ह्या ॲप द्वारे मिळणार आहे. हे ॲप ची निर्मिती फुले कृषी विद्यापीठाच्या व्हॉटर डिपार्टमेंट द्वारे झाली आहे. आणि खास गोष्ट म्हणजे हे ॲप अगदी मोफत वापरता येणार आहे. (Best Agriculture Apps)
तसेंच ॲप मध्ये विचारलेली माहिती भरून अगदी सहजरीत्या हे ॲप वापरता येते. शेतावर आल्यावर आज किती वेळ पंप चालू ठेवायचा ? किती लिटर पाणी द्यावे ? अशा प्रकारची पुरेपूर माहिती या ॲप वर मिळून जाते. या ॲप मुळे पाण्याची गुणवत्त्ता वाचते, खते वाचतात आणि योग्य प्रमाणात नफा होण्यास मदत होते.
ई पीक पाहणी ॲप
२०२४ च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी करण्यासाठी १ ऑगस्ट २०२४ पासून सुरुवात झाली आहे. तसेंच शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीक पाहणी ही १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत करता येणार आहे. राज्य सरकार द्वारे मागील ४ वर्षा पासून ही ई-पीक पाहणी उपक्रम राबवत आहे. याकरिता पिकांची नोंद करण्यासाठी ई – पीक पाहणी हे ॲप तयार करण्यात आले आहे. ह्या ॲप द्वारे ई-पीक पाहणी करणे अतिशय सोप्पे झाले आहे. ॲप द्वारे ई- पीक पाहणी कशी करावी यासंदर्भातील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून वाचु शकता.
ई-पीक पाहणी शेवटची तारीख जवळ आली , मोबाईल वरून करता येणार नोंदणी !
तर मंडळी असेच नवनवीन माहितीपुर्ण लेख वेळोवेळी अगदी मोफत वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा…. व्हाट्सअप ग्रुप
हेही वाचा: –Agriculture Bussines Ideas : शेतीसोबत करता येणारे हे 3 जोडधंदे देतात नफाच नफा !