Bhu Aadhar Scheme : 6 कोटी शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना मिळणार युआयडी…

Bhu Aadhar Scheme : आता शेतजमीनींचे बनणार आधार कार्ड…

आता आधार कार्डाप्रमाणेच ६ कोटी शेतकऱ्यांच्या जमिनींना युनिक आयडेंटीफिकेशन नंबर म्हणजेच युआयडी क्रमांक देण्यात येणार आहे . ज्याला भू आधार कार्ड असे म्हण्टले जाईल. राज्य सरकारच्या सहकार्याने हो योजना अमलात येणार आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या द्वारे(Bhu Aadhar Scheme)विविध जमीन सुधारणांचा एक भाग म्हणून ग्रामीण तसेंच नागरी भागातील सर्व जमिनीसाठी भू – आधार योजना राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

Bhu Aadhar Scheme
Bhu Aadhar Scheme

जमिनीच्या नोंदीचे डिजिटायजेशन करण्याच्या उद्देशाने या योजनाचा आरखडा करण्यात आला आहे.(Bhu Aadhar Scheme)

तसेंच पाच राज्यांत जनसमर्थन किसान क्रेडिट कार्ड दिली जाणार आहेत. यासोबतच देशातील ४०० जिल्ह्यात खरिप पिकांचे डिजिटल सर्वेक्षण देखील करण्यात येणार आहे.

केंद्र सरकार कडून या वेळेस शेतीकरिता 2024- 25 च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण १.५२ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे . यासोबतच बागायती पिकांच्या हवामानास अनुकूल अशी ३२ पिकें व फळांच्या १०९ नवीन उच्च-उत्पादकता असलेले वाण विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहेत. अशे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.(Bhu Aadhar Scheme)

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : मोफत 3 सिलेंडर नक्की कोणाला ? जाणून घ्या GR मध्ये काय ?

२०२४ मध्ये १.२५ लाख कोटी रुपयांची तरतूद कृषी विभागासाठी करण्यात आली होती, तर यावर्षात २१.६ टक्क्यांची वाढ करत २७ हजार कोटींची जादा तरतूद या मध्ये करण्यात आली आहे.

निर्मला सीतारामन पुढे असेही म्हणाल्या की, येत्या २ वर्षांत देशातील १ कोटी शेतकरी बांधवांना प्रमाणपत्र तसेंच ब्रेडिंगच्या आधारे नैसर्गिक शेतीसोबत जोडण्यात येणार आहे.

यॊसोबतच आवश्यकतेनुसार १० हजार जैविक खतांची केंद्रे उभारली जाणार आहेत.

कृषी उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होता यावे याकरिता त्याचे उत्पादन, साठवणूक व विपणन व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

सोयाबीन, मोहरी, तिळ, भुईमूग, आणि सूर्यफूलासारख्या तेलवर्गीय पिकांकरिता नवीन आराखडा तयार केला जाणार आहे.

तर मंडळी , शेतिविषयक अशाच नवनवीन अपडेड वेळोवेळी मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप चे सदस्य व्हा ! आणि हा लेख आपल्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा… (व्हाट्सअप ग्रुप)

हेही वाचा :

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र : मोफत 3 सिलेंडर नक्की कोणाला ? जाणून घ्या GR मध्ये काय ?

Post office saving scheme marathi : 5 वर्षांत 12 लाख रुपयांचे व्याज देणारी ही योजना तुम्हाला माहित आहे का ?

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment