Biogas Anudan Yojana Online Registration : बायोगॅस अनुदान योजनेसाठी मिळणार 10 ते 70,000 रुपये अनुदान ! असा करा अर्ज……

Biogas Anudan Yojana Online Registration : बायोगॅस अनुदान योजनेसाठी मिळणार १० हजार ते ७०,००० रुपयांपर्यंतचे अनुदान ! जाणून घ्या संपुर्ण अर्जप्रक्रिया इथे..

राज्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात.अशीच एक योजना म्हणजे ‘बायोगास अनुदान योजना’. आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असणाऱ्या नागरिकांना या योजनेद्वारे, बायोगॅस प्रकल्प उभारणीकरिता अनुदान देण्यात येते.

Biogas Anudan Yojana Online Registration
Biogas Anudan Yojana Online Registration

Biogas Anudan Yojana Online Registration

मनरेगाच्या माध्यमातून सुद्धा बायोगॅस योजना असून सोबतच MNRE च्या माध्यमातून देखिल बायोगॅस साठी ८०० ते ८५० कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देखील सरकारने केली आहे.

बायोगॅस द्वारे होणारे फायदे :

बायोगॅसचा इंधन म्हणून देखील वापर केला जातो. आणि हीच पद्धत गोबरगॅस प्रकल्पात सुद्धा वापरतात.

बायोगॅस हा एक ज्वलनशील गॅस असल्यामुळें त्याचा इंधन म्हणून चांगला वापर केला जाऊ शकतो.

गोबरगॅस हा देखील एक प्रकारचा बायोगॅसच आहे.

बायोगॅस हा इंधन म्हणून तयार करता येत असल्याने हा एक अपारंपारिक उर्जास्रोत असतो.

कचरा व्यवस्थापन तसेंच सांडपाणी शुद्धीकरण यामध्ये ‘बायोगॅस’ हा ‘उप घटक’ म्हणून तयार होत असतो.(Biogas Anudan Yojana Online Registration )

बायोगॅस अनुदान योजनेची उद्दिष्टे :

(Biogas Anudan Yojana Online Registration )

जैविक इंधन वापरण्याला चालना देऊन विजेवरील भार कमी करणे.

सेंद्रिय खत वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे.

खेडेगावात बायोगॅस उभारणीतून स्वयंपाकरिता इंधन व सेंद्रीय खताचा पुरवठा करणे.

ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारणे.

बायोगॅस अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचा मोबाइल नंबर
  • अर्जदाराचे बँक पासबुक

बायोगॅस योजना अनुदान २०२४ या कार्यक्रमांतर्गत विविध घटकांकरिता पुरवल्या जाणाऱ्या केंद्रीय आर्थिक सहाय्याचे तपशील खालीलप्रमाणे :(Biogas Anudan Yojana Online Registration )

लहान बायोगॅस प्लांटसाठी
(1 -25 घनमीटर प्रतिदिन प्लांट क्षमता):

क्यूबिक मीटरमध्ये प्लांटच्या आकारानुसार 9,000 रुपये ते 70400 रुपये असेल.

त्यापैकी सर्वसाधारण गटासाठी – रू. 9,000/- प्रति संयत्र,अनुसूचित जाती व जमाती – रु. 11,000/- प्रति संयत्र.

आणि शौचालय जोडणी केल्यास –रु. 1,200/- प्रति संयत्र.

( अनुदान तुमच्या बायोगॅस प्लांटच्या आकारावर अवलंबून आहे.)

Biogas Anudan Yojana Online Registration

ऑनलाईन अर्ज कसा करावा :

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम MNRE च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

वेबसाईट च्या होम पेजवर आल्यावर वरच्या भागात उजव्या बाजूला असलेल्या register या बटणावर क्लिक करावे.

आता तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, राज्य, जिल्हा निवडावा त्यानंतर send OTP या पर्यायावर क्लीक करावे.

आता , तुम्हाला प्राप्त झालेला otp टाकून, रजिस्ट्रेशन पूर्ण करा.

लॉगिन करण्यासाठीं होम पेज मध्येच सर्वात वर उजव्या बाजूला असलेल्या लॉगीन या पर्यायावर क्लीक करावे.

लॉगीन पर्यायावर क्लीक केल्याच्या नंतर, तुमच्यासमोर 3 पर्याय दाखवले जातील त्यातील ‘बेनिफिषरी’ या पर्यायावर क्लीक करावे.

आता पुन्हा तुमचा मोबाइल नंबर तसेंच तिथे सांगितलेला कॅपचा कोड टाकावा , आणि सेंड OTP पर्यायावर क्लिक करावे.

प्राप्त झालेला OTP टाकल्या नंतर एक New Page Open होईल.

नवीन पेजवरच डाव्या बाजूला असणाऱ्या new application हा पर्याय उघडा.

New application पर्यायावर क्लिक केल्या नंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील ते असे की, 1 ते 25 घनमीटर पर्यंतचे छोटे बायोगॅस.
आणि
25 घन मीटर पेक्षा मोठे बायोगॅस.

यापैकी तुम्हाला जो हवा तो निवडा.

आता तुमच्या समोर एक application फॉर्म उघडेल. तिथे विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी.

नाव ,मोबाईल नंबर , आधारकार्ड, ईमेल आयडी, निवासी पत्ता अशी माहिती विचारली असेल.

माहिती भरल्या नंतर, टॉयलेट लिंक बायोगॅस हवं ? हो किंवा नाही ते निवडावे.

तुमच्याकडे आधीच कोणता बायोगॅस आहे की नाही ? ते निवडावे.

नंतर तुम्हाला तुमच्या घरी गाई, म्हैसी, वासरे, रेडके एकंदरीत पशु किती आहेत ते लिहा.

आता ही सर्व माहिती भरल्यावर पुन्हा एकदा तपासून घ्या आणि खाली दिलेल्या सबमिट या बटणवर क्लिक करा. आता तुम्हाला success हा मेसेज येईल. याचा अर्थ तुमचा फॉर्म योग्य रित्या भरला गेला आहे.

आता अर्जा बाबतच्या ज्याकाही अपडेट असतील, त्या शासनातर्फे तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर देण्यात येतील. तसेंच बायोगॅस अनुदानाची पुढची जी काही प्रोसेस असणार आहे ती कळवण्यात येईल.

तर मंडळी ही माहिती आवडली असेल तर, नक्कीच आपल्या गरजूवंत शेतकरी बांधवांपर्यंत पोहवचा.. आणि अशाच नवनवीन अपडेट नियमित आणि मोफत वाचण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा !

( 👉येथे  क्लिक करा   

हेही वाचा:  कडबा कुट्टी मशीनसाठी मिळणार अनुदान, जाणून घ्या अर्जप्रक्रिया..

कापुस सोयाबीन उत्पादक : शेतकऱ्यांना मिळणार , प्रती हेक्टर 5000 रुपये अनुदान !

Saur krushi vahini Yojana 2.0: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मान्यता..

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment