BMC Recruitment : महानगरपालिकेत 1,846 पदांसाठी मेगा भरती !

BMC Recruitment : नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. आपण प्रभात मराठीच्या माध्यमातून शेति, योजना आणि नोकरी संदर्भातील खास अपडेट वेळोवेळी पाहत असतो. तर आजच्या या लेखात सुद्धा आपण नोकरी संदर्भातील एक खास अपडेट पाहणार आहोत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या जास्तीत जास्त तरुणां पर्यंत हा लेख नक्की पोहचवा.

मुंबई महानगर पालिकेच्या कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी ही मेगा भरती होणार आहे. यावेळी तब्बल १ हजार ८४६ पदांसाठी ही भरती असणार आहे. त्यामुळे नोकरी पासून वंचित असणाऱ्या तरुणांना नक्कीच ही सुवर्णं संधी असू शकते.(BMC Recruitment)
या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करण्यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भरती बद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे.
https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn
पदांनुसार मिळणार पगार ;
विविध खात्यांच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधील 25,500 ते 81,100 (पे मॅट्रिक्स-एम 15) अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पदनाम: लिपिक) ही 1846 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
यामध्ये अनुसूचित जाती साठी 142, अनुसूचित जमातीसाठी 150, विमुक्त जाती-अ साठी 49, भटक्या जमाती-ब साठी 54 , भटक्या जमाती-क साठी 39, भटक्या जमाती-ड साठी 38, विशेष मागास प्रवर्ग साठी 46, इतर मागासवर्गसाठी 452, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकास्थी 185, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गसाठी 185 तर खुला प्रवर्गसाठी 506 अशा रिक्त जागा आहेत.(BMC Recruitment)
अर्ज करण्यासाठी ;
अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारानी
महानगर पालिकेच्या, https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या संकेतस्थळांवरील भरतीची जाहिरात वाचावी. या जाहिरातीमध्येच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक म्हणजेच यूआरएल दिले गेले आहे. येथून तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी जाहिरातीतील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात, आणि त्यांचे काटेकोरपणे पालन करुन विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज विहित मुदतीत सादर करावा. यांनतर भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी. मार्गदशर्नासाठी किंवा मदतीसाठी ९५१३२५३२३३ या क्रमाकावर संपर्क साधू शकता.(BMC Recruitment)
हेही वाचा : Solapur Corporation Recruitment 2024 : सोलापुर महानगरपालिकेअंतर्गत नोकरीची सुवर्णं संधी !
Vishal kamble , Founder : Prabhatmarathi.com : passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi.