Divyang Yojana 2025 : दिव्यांगांना मिळणार व्यवसाय करण्यासाठी मोफत गाडी.

Divyang Yojana 2025 : दिव्यांगांना मिळणार व्यवसाय करण्यासाठी मोफत गाडी.
दिव्यांग व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी मिळणार मोफत गाडी असा करा अर्ज ! दिव्यांगाना व अपंगाना व्यवसायासाठी मिळणार मोफत गाडी

दिव्यांग बांधवाना आता सरकार देणार मोफत गाडी | अर्ज करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. तरी लवकरात-लवकर आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.(Divyang Yojana 2025 )
नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले सहर्ष स्वागत आहे. प्रभात मराठीच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा घेत असतो, तर आजच्या या लेखात सुद्धा आपण अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रभात मराठी द्वारे आपण शेतकरी बांधव, दिव्यांग बांधव, विद्यार्थी मित्र अशा विविध घाटकांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा आपण घेत असतो.
आजच्या लेखात आपण दिव्यांग बांधवासाठी राबवण्यात येणाऱ्या एका महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात आपण काही ठळक मुद्दे जाणून घेणार आहोत.जसे की, योजनेचा मुख्य उद्देश, आवश्यक कागदपत्रे? अर्ज कसा करायचा ?
(Divyang Yojana 2025 )
योजनेचा मुख्य उद्देश:
दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार मोफत गाडी :
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याकरिता महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळामार्फत हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेइकल) मोफत उपलब्ध करून देण्याची योजना राबवण्यात येत असल्याचे आश्वासन सरकार कडून देण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींनी दुसऱ्यावर अलंबून न राहता स्वबळावर आर्थिक दृष्ट्या सक्षम बनावे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, हा निर्णय घेतला आहे. याआधी देखील राज्य सरकार व केंद्रसरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवन्याय आल्या आहेत.(Divyang Yojana 2025 )
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत देण्यात आली होती, परंतु आता अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, आता उमेदवारांना १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती अधिकृत संकेस्थळळांवर उपलब्ध करण्यात आलेली आहे.
योजनेच्या अटी :
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक.
- दिव्यांगाचे प्रमाण अर्जदाराकडे किमान ४०% असावे.
- दिव्यंगत्तवाचे UDID प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराचे वय 18 ते 55 दरम्यान असावे.
- मतिमंद अर्जदाराच्या बाबतीत त्याचे पालक अर्ज करण्यास सक्षम असतील.
- अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखा पेक्षा अधिक नसावे.
- लाभार्थी निवड करताना , अधिक दिव्यांग असणार्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
( वरील प्रमाणे देण्यात आलेल्या प्रमुख अटी आहेत. याव्यतिरिक्त आणखी काही अटी असणार आहेत.त्या तुम्ही संकेतस्थळावरुन वाचु शकता.)
योजनेचा लाभ घेण्याकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य असणार आहे.)
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- किंवा मतदान ओळखपत्र
- दिव्यांग प्रमाणपत्र
- UDID कार्ड
- रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
- मोबाईल नंबर(चालू असलेला द्यावा)
- ई-मेल आयडी
योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. शिवाय ह्या कागदपत्रामध्ये बद्दल देखील करण्यात येऊ शकतो त्यामुळे आपण अधिकृत संकेतस्थळ किंवा जवळील कार्यालयाशी संपर्क साधावा व अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.(Divyang Yojana 2025 )
योजनच्या अधिकच्या माहितीकरिता, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर आपले अर्ज 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत.(Divyang Yojana 2025 )
अधिकृत वेबसाइट खालीलप्रमाणें
https://register.mshfdc.co.in/home
अर्ज करण्यासाठी, येथे क्लिक करा
https://register.mshfdc.co.in/apply
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम वरील संकेतस्थळावर भेट द्या.
आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
पोर्टलवर लॉगिन करून अर्जाचा फॉर्म भरून घ्या.
आवश्यक असणारी कागदपत्रे दिलेल्या पर्यायामध्ये अपलोड करा.
सर्व माहिती व्यवस्थित तपासून अर्ज सबमिट करा, या बटनावर क्लीक करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या.
हे लक्षात ठेवा :
सदर योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी व शर्ती कोणत्या आहेत? या बद्दलची माहिती योजनेच्या संकेतस्थळावरून तपासून घ्या.
MJPJAY GR : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना , नवीन निधी मंजूर. संपूर्ण माहिती वाचा इथे !
अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण लेख तुमच्या पर्यंत नियमित पोहचत रहावेत याकरिता प्रभात मराठीच्या व्हाटसॲप ग्रुपचे सदस्य व्हा.
Vishal kamble , Founder : Prabhatmarathi.com : passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi.