Driving License : वयाच्या 16 व्या वर्षी सुध्दा मिळू शकते ड्रायविंग लायसन्स ; वाचा इथे…
आपल्याला ठाऊक असेलच की, वाहन चालवण्याकरिता सध्या ड्रायव्हिंग लायसन्स किती गरजेचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठीचे वेगवेगळ्या देशात वेगवेगळे नियम आहेत. त्या नियमांची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला लायसन्स देण्यात येते.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याकरिता इतर देशात साधारणता वय केवळ 18 वर्षे आहे. तसेंच भारतात देखील ड्रायव्हिंग लायसन्स 18 वर्षांनंतरच बनवले जाऊ शकते. पण तुम्हाला माहीत आहे का ? एक असेही ड्रायव्हिंग लायसन्स आहे जे तुम्हाला वयाच्या 16 व्या वर्षात तयार करता येते. परंतु लायसन्सचा हा परवाना फक्त गियरलेस वाहन म्हणजेच स्कूटी चालवण्यासाठी देण्यात येतो. तर आजच्या लेखात आपण याच ड्रायव्हिंग लायसन्सबद्दल माहिती घेणार आहोत.
1988 मोटार वाहन कायद्यानुसार तुम्हाला वयाच्या 16 व्या वर्षी सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकते. परंतु हे लायसन्स मिळवण्यासाठी काही अटींचा समावेश करण्यात आलेला आहे. हे लायसन्स शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्स प्रमाणेच असते. परंतु या लायसन्स द्वारे तुम्ही काही विशिष्ट प्रकारचेच वाहन चालवू शकता.(Driving License)
मोटार वाहन कायदा 1988 च्या चॅप्टर-2 मधील मोटार वाहन चालकांच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या चौथ्या मुद्द्यात दिलेल्या माहिती प्रमाणे . 18 वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती त्याला सार्वजनिक ठिकाणी गाडी चालवता येत नाही. पण यासोबतच अशी बाईक ज्याचे इंजिन 50 सीसी क्षमतेपेक्षा कमी असेल असेही सांगण्यात आले आहे. लायसन्स मिळाल्यानंतर 16 वर्षे वयाच्या व्यक्तीला ते चालवता येते. या लायसन्समुळे ते इतर कोणतेही वाहन चालवू शकत नाही. त्यासाठी त्याला 18 वर्षांचा झाल्यानंतर हे लायसन्स अपडेट करावे लागेल. हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्याची प्रक्रिया सामान्य ड्रायव्हिंग लायसन्सप्रमाणेच असते.
ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढतात ?
ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी तुम्हाला आपल्या भागातील RTO ऑफिसला भेट द्यावी लागेल. तिथे जाऊन आपल्या आधार कार्डची माहिती देऊन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी तुम्हाला अर्ज करता येतो . आधार कार्ड नसल्यास तुम्ही मोबाईल नंबर देऊन सुद्धा अर्ज करू शकता. मोबाईल नंबर वर आलेला OTP देऊन , पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि अथॉरिटी फी जमा केल्यानंतर, तुम्हाला शिकाऊ लायसन्सकरिता टेस्ट देता येते.
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..
येथे क्लिक करा :- whatsapp.com
हेही वाचा: – दिवाळी मध्ये कार खरेदी करायची आहे ? बँकेकडून 10 लाख रुपये कार लोन केल्यावर किती येईल ईएमआय?
Aadhar Card Update Online : आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करता येते का ?