Drone Subsidy Scheme : या योजनेच्या माध्यमातून, ड्रोन खरेदी करण्यासाठी मिळवा 4 ते 5 लाख रुपयांचे अनुदान !

Drone Subsidy Scheme : या योजनेच्या माध्यमातून, ड्रोन खरेदी करण्यासाठी मिळवा 4 ते 5 लाख रुपयांचे अनुदान !
Drone Subsidy Scheme
Drone Subsidy Scheme

कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता तसेंच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याकरिता, केंद्र आणि राज्य सरकारद्वारे अनेक प्रकारच्या आर्थिक योजना राबविल्या जात असतात. आणि या योजनांच्या माध्यमातूनच शेतकरी बांधवांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येत असते. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याकरिता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना मदत केली जातें. अशाच प्रकारची कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त असणारी योजना म्हणजे ‘ड्रोन अनुदान योजना.’ आता ड्रोनचा वापर हा शेतकऱ्यांकरिता दुहेरी फायद्या देण्याचे काम करणार आहे. ड्रोनचा वापर पिकांवर कीटकनाशक फवारणीसाठी फायद्याचा ठरणार आहेच .परंतु या माध्यमातून रोजगार निर्मितीला देखील चालना देणार आहे.

त्यामुळे आता केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेच्या माध्यमातून ‘ड्रोन’ घटकाचा समावेश केला आहे. तसेंच या ड्रोन खरेदी करिता योग्य ते अनुदान देण्यात येत आहे. सन 2024-25 यासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत 100 ड्रोन खरेदीसाठी महाराष्ट्र राज्याकरिता वार्षिक कृती आराखडा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळेच आता शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था व कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थी यांना या माध्यमातून अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

(Drone Subsidy Scheme)

हेही वाचा : संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवानिवृत्त योजनेत मोठा बदल , वाचा इथे..

किती मिळणार अनुदान? आणि कोणाला ?

सदर योजनेच्या माध्यमातुन शेतकरी सहकारी संस्था यासोबतच शेतकरी उत्पादक कंपन्यांना जवळपास ड्रोन खरेदीच्या 40% म्हणजे चार लाखापर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तर कृषी आणि कृषी संबंधित पदवीधरांना 50% म्हणजेच पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. अनुसूचित जाती/ जमाती आणि महिला शेतकऱ्यांना 50 % म्हणजेच 5 लाख रुपये तर सर्वसाधारण शेतकऱ्यांना 40% म्हणजे 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. या योजनेचा म्हणजेच अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवण्याबाबतची सूचना कृषी आयुक्तांनी दिली आहे.(Drone Subsidy Scheme)

ड्रोनचा फायदा शेतीसाठी कसा होणार ?

शेत-पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास अथवा रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून पिकांवर फवारणी केली जाते. परंतु बऱ्याचदा मोठी शेतजमीन असल्याकारणाने पिकांवर फवारणी करण्यासाठी अधिक कालावधी लागतो. आणि खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात येतो. इतकेच नाही तर, कधीकधी विषबाधेची समस्या देखील उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा सर्व बाबी लक्षात घेऊन या योजनेची मांडणी केली आहे. ड्रोनच्या वापराने पिकांवर फवारणी करण्याची प्रक्रिया सोप्पी झाली आहे. आता शेतकरी स्वतः ड्रोन बद्दलची माहिती घेऊन फवारणी करू शकतात किंवा तज्ञ प्रशिक्षण चालकांकडून देखील फवारणी करून घेऊ शकतात. यासोबतच ज्या तरुणांना रोजगार नाही ते इतर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन फवारणीचे काम करू शकतात आणि आपला रोजगार बनवू शकतात.

हेही वाचा: –ॲग्रीस्टेक योजना नेमकी आहे तरी काय ? त्याचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ? वाचा सविस्तर माहिती इथे..

योजनेसाठी अर्ज करण्याकरिता येथे भेट द्या

तर तुम्हाला देखील या योजने बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. तसेंच अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.(Drone Subsidy Scheme)

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा :-  येथे क्लिक करा 

Leave a Comment