Favarni Pump Anudan Yojana : शेतकऱ्यांना दिलासा ! बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप अनुदानाचे अर्ज सादर करण्याकरिता मिळणार मुदतवाढ!
केंद्र , राज्य शासनाद्वारे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना राबवल्या जात असतात. शेतकऱ्यांना शेती करण्यास अडचणी येऊ नयेत तसेंच शासनाकडून आर्थिक पाठबळ मिळावे हा या योजनांचा मुख्य उद्देश असतो.
या वर्षात महायुती सरकारने बऱ्याच योजना आखल्या आहेत. आणि राज्यभरातुन चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे.(Favarni Pump Anudan Yojana)
अशाच एका योजनेद्वारे शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड पंप हे 100% अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. आणि यासाठी अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे.
इच्छुक आणि पात्र शेतकरी बांधवांना 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार असल्याची बातमी समोर आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात बॅटरी ऑपरेटेड पंपासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया.
असा करता येणार अर्ज ?
सदर योजनेकरिता अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, ज्याची लिंक खालील प्रमाणे आहे.
https://mahadbt.maharashtra.gov.in
आता या वेबसाईटमध्ये या वेबसाईटवर आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन घ्यावे.
त्यानंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. आता कृषी यांत्रिकीकरण या पर्यायामध्ये जावे.
आता ‘मुख्य घटक’ या पर्यायामध्ये जाऊन ‘तपशीलवर’ क्लिक करून ‘मनुष्यचलित औजारे’ हा घटक निवडावा.
आता औजारे/ यंत्र व उपकरणे-पिक संरक्षण औजारे या बाबीमध्ये जाऊन बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन) हा घटक निवडावा . त्यानंतर हा अर्ज जतन करावा. (Favarni Pump Anudan Yojana)
अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज सादर करता येणार आहे. फक्त 14 ऑगस्ट पर्यंत हा अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अशाच नवनवीन अपडेट वाचण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..
हेही वाचा: Kisan drone yojana : किसान ड्रोन योजने बद्दल सविस्तर माहिती वाचा इथे