Food Processing Industry Subsidy आता अन्न प्रक्रिया उद्योगासाठी दिले जाणार तीन कोटींपर्यंतचे अनुदान !
कृषी विभागामार्फत “पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेंच यामध्ये कृषी प्रक्रिया उद्योजक उभारणीसाठी प्रकल्पाच्या ३५ % आणि कमाल ३ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामायिक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटिंग आणि ब्रँन्डिंग इत्यदिकरीता अर्थसहाय्य देणार आहे.
याबरोबरंच वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प, किमतीच्या ३५ % किंवा जास्तीत जास्त १० लाख तर सामाईक पायाभूत सुविधा, इन्क्युबेशन केंद्र, मूल्यसाखळी घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ % किंवा कमाल ३ कोटी अर्थ साहाय्य देण्यात येणार आहे.
भागीदारी संस्था, तसेच गट लाभार्थीमध्ये शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी, शासकीय संस्थांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी किंवा त्यांचे विस्तारीकरण, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण करण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभाग नोंदवावा.
प्रकल्प आराखडे तयार करणे, बँकेकडे सादर करणे, तसेच नोंदणीसाठी कृषी विभागाकडून जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत सहाय्य केले जाणार आहे.
आत्मातील नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकरी यांनी प्रकल्प करतेवेळी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेसोबत कृषी पायाभूत योजनेची सांगड घातल्यास अनुदानासोबत तीन टक्के व्याजात सवलत मिळणार आहे.
असा आहे लक्ष्यांक Food Processing Industry Subsidy चे !
वैयक्तिक घटकांचे ४३७ लक्षांक प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३९१ लक्षांक साध्य झाले असून लाभार्थींना १३.५० कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात येत आहे.
जिल्ह्यात ३९१ उद्योग सुरू करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी अर्ज करताना कृषी सहाय्यक आणि तालुक्याचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
तसेंच अधिक माहितीसाठी pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवा.
हेही वाचा:
MJPJAY GR : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना , नवीन निधी मंजूर !
Maha Dbt Biyane Yojana 2024: बियाणे अनुदान योजना
LIC Loan: किती रुपयांचे कर्ज मिळवून देते LIC policy? जाणून घ्या इथे..
Banana farming : 12 वी नंतर, शेती करण्याचा निर्णय आणि आज नफा ऐकून व्हाल थक्क..