Gai mhashi Vatap Yojana 2024 : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकार करणार दुधाळ गाई म्हशींचे वाटप; वाचा काय आहे प्रकल्प !

Gai mhashi Vatap Yojana 2024 ; वाचा सविस्तर माहिती इथे…

नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. प्रभात मराठीच्या माध्यमातून आपण शेतीसंदर्भातिल महत्त्वपुर्ण बातम्या , शासकीय योजना आणि नोकरी विषयक अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आजच्या या लेखात सुद्धा आपण कृषी क्षेत्रातील एक महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहचवा.

मराठवाडा आणि विदर्भातील दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्या करिता १४९ कोटी रुपयांच्या निधीला दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी मंजुरी देण्यात आली आहे. विदर्भ तसेंच मराठवाड्या मधील सर्व जिल्ह्यांचा समावेश या प्रकल्पा मध्ये करण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.या प्रकल्पतून पात्र उमेदवारांना दुधाळ गाय आणि म्हशींचे वाटप करण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती.

Gai mhashi Vatap Yojana 2024
Gai mhashi Vatap Yojana 2024

एन.डी.डी.बी. डेअरी, आणि मदर डेअरी च्या सहयोगाने हा प्रकल्प मराठवाड्यासह विदर्भात राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ३२८ कोटी ८२ लाख रुपये खर्च होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील या जिल्ह्यात राबवला जाणार हा प्रकल्प ;

चंद्रपूर , भंडारा , नागपूर, बुलढाणा, वर्धा,वाशीम , यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, बीड ,अकोला, धारावशिव, लातूर, जालना , हिंगोली,परभणी, नांदेड या जिल्ह्यांचा सदर प्रकल्पा मध्ये समावेश करण्यात आला आहे.(Gai mhashi Vatap Yojana 2024)

कधी राबवला जाईल हा प्रकल्प ;

Gai mhashi Vatap Yojana 2024

२०२६ किंवा २०२७ या वर्षांत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. म्हणजेच २०२४ ते २०२७ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी १९ जिल्ह्यांना १३,४०० दुधाळ गाई म्हशी वाटप करण्यात येणार आहेत , यासोबतच नागपूर हे या प्रकल्पाचे मुख्यालय असणार आहे. तसेंच जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्या मार्फत अंमलबजावणी केली जाणार आहे.

इतकेच नाही तर, उच्च दूध उत्पादक क्षमता असणाऱ्या गाई म्हशींचे वाटप, पशु प्रजनन पूरक खाद्यांचा पुरवठा ,दुधातील Fat , SNF वर्धक खाद्याचा पुरवठा, कडबा कुट्टी मशीनचे वाटप आणि आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्याकरिता शेतकऱ्यांना विविध प्रकारे प्रशिक्षण देखील या प्रकल्पातुन दिले जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्ध व्यवसायाला नक्कीच चालना मिळेल असे विधान राज्यसरकार द्वारे करण्यात आले आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी कशी आणि कधी केली जाणार ?

मराठवडा आणि विदर्भ जिल्ह्यातील पशुपालकांना म्हणजेच पात्र लाभार्थ्यांना दररोज ८ ते १० लिटर दूध देणाऱ्या गाई म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून मिळालेली गाय किंवा म्हैस ही लाभार्थ्याला ३ वर्षां पर्यंत विकता येणार नाही. ही गाय किंवा म्हैस प्रकल्पाच्या नावे तारण ठेवावी लागणार आहे. तसेंच ३ वर्षां पर्यंतचा जनावरांचा विमा देखील काढण्यात येणार आहे , विमा उतरवलेले जनावर मृत झाल्यास दुसरे दुधाळ जनावर घेणे बांधनकारक असणार आहे.(Gai mhashi Vatap Yojana 2024)

अशी केली जाणार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची निवड ;

Gai mhashi Vatap Yojana 2024 ;

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर उमेदवाराकडे आधीच दोन दुधाळ जनावरे असणे आवश्यक आहे.

मागील काही वर्षात खाजगी दूध संकलन केंद्रात दुधाची विक्री करण्यात आलेली असावी.

अर्जदार शेतकऱ्याने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्या मध्ये मागील कोणत्याही सरकारी योजनाचा लाभ घेतलेला नसावा.

एका गावातील जास्तीत जास्त ५ लाभार्थी निवडी करिता पात्र ठरवण्यात येणार आहेत.आणि एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या प्रकल्पाचा लाभ दिला जाणार.

Gai mhashi Vatap Yojana 2024

आता हा प्रकल्प कधी पासून राबवला जाणार ? जनावरांचे वाटप कधी होणार ? अर्जप्रक्रिया काय असणार ? या बद्दलची कोणतीही माहिती अद्द्याप तरी समोर आली नाहीये; परंतु १४ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

अर्ज करताना लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे 

१) आधार कार्ड

२) सातबारा

३) ८ अ उतारा

४)अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत.

५) पासपोर्ट साइज फोटो

६) सातबारा मध्ये नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा असल्यास.

७) अपत्य दाखला / स्वघोषणा पत्र

८) रहिवासी प्रमाणपत्र

९) दारिद्र्य रेषेखालील असलेल्याचे प्रमाणपत्र.

१०) बँक खाते पासबुक.

११)दिव्यांग असल्यास तो दाखला.

१२) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र.

१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स.

१४)शैक्षणिक पात्रता दाखला.

१५) जन्मतारखेचा पुरावा.

१६) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.

१७) रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्ड.

Gai mhashi Vatap Yojana 2024

या प्रकल्पा संदर्भातील आणखी काही अपडेट समोर आली की प्रभात मराठीवर नक्कीच प्रसिद्ध करण्यात येईल ; त्याकरिता प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..

येथे क्लिक करा: –  👉 👉 व्हाट्सअप ग्रुप  

आणि ही माहिती आवडल्यास आपल्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहचवा !

हेही वाचा: PM Kisan Samman Nidhi Helpline Number : इथे करता येणार अर्ज , आणि हेल्पलाईन नंबर पहा..

Kisan drone yojana : किसान ड्रोन योजने बद्दल सविस्तर माहिती वाचा इथे

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment