Garlic And Corn Crop Variety : मका आणि लसणासाठी वापरा हे वाण आणि मिळवा भरगोस उत्पादन..

Garlic And Corn Crop Variety : मका आणि लसणासाठी वापरा हे वाण आणि मिळवा भरगोस उत्पादन..
Garlic And Corn Crop Variety
Garlic And Corn Crop Variety

शेती करत असताना तसेंच एखाद्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊन चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी सर्वच प्रकारचे योग्य व्यवस्थापन योग्य वेळी करणे अतिशय महत्त्वाचे असते.(Garlic And Corn Crop Variety)

या व्यवस्थापना मध्ये बरेच घटक लक्षात घ्यावे लागतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा घटक म्हणजे पिकांच्या लागवडीकरिता लागणाऱे योग्य वाण . पिकांच्या लागवडीसाठी योग्य वाणांची निवड करणे अतिशय महत्तवाचे असते.(Garlic And Corn Crop Variety)

कोणतेही पिक असो परंतु त्याला लागणाऱ्या वाणाची निवड योग्यरित्या केली तर, त्यामधून नक्कीच आपल्याला भरगोस उत्पादन मिळण्यास मदत होते. मात्र जर बियाणेच सदोष निघाले तर त्याचा खूप आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसतो . आणि यामुळे बऱ्याच नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते.त्यामुळेच पिकांची लागवड करण्यापूर्वी योग्य वाणाची निवड करणे , गरजेचे असते.

तसे पाहायला गेलं तर, देशात बऱ्याच पिकांच्या अनेक दर्जेदार वाणांच्या विषयी संशोधन तसेंच वाण विकसित करण्यात विविध कृषी विद्यापीठे अग्रेसर आहेत.

याचप्रमाणें महाराष्ट्रामधील अकोल्यातिल नामांकीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या कामांत अग्रगण्य आहे. पिकांच्या अनेक सुधारित वानांवर संशोधन सध्या या विद्यापीठात सुरू आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकेल अशा प्रकारचे भरपूर वाण विद्यापीठातून उपलब्ध करून देण्यात येतात.

विद्यापीठाकडून यावर्षी मक्याचे पीडीकेव्ही आरंभ बीएमएच (BMH) 18-2 आणि लसणाचे पीडीकेव्ही (PDKV) पूर्णा ( एकेजी 07) हे वाण विकसित करण्यात आले आहेत. तर उत्पादनाच्या बाबतीत हे दोन्ही वाण यशस्वी ठरतील तसेंच भरघोस उत्पादनासाठी नक्कीच शेतकऱ्यांनी या वाणाचा विचार करावा असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेले वाण पुढीलप्रमाणें.

१) मक्याचे पीडीकेव्ही आरंभ
(बीएमएच 18-2) वाण BMH 18-2

हे मक्याचे वाण असून , या वाणाची शिफारस ही महाराष्ट्रात खरीप व कोरडवाहूसाठी करण्यात आली आहे तर, या वाणापासून कडब्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेता येते. वाणाच्या वापराने लागवडीनंतरच्या ९० ते १०० दिवसामध्ये हे वाण परिपक्व तसेंच काढणीसाठी तयार होते.

हे वाण पानावरील करपा रोगासाठी मध्यम प्रतिकारक असून हेक्टरी १०१ क्विंटल पर्यंत उत्पादन सहज मिळते.

(Garlic And Corn Crop Variety)

२) लसणाचे पीडीकेव्ही पूर्णा( एकेजी 07) वाण
(AKG 07)

लसणाचे हे वाण म्हणजेच पीडीकेव्ही पूर्णा कृषी विद्यापीठाने मागच्या वर्षीच्या हंगामा दरम्यानच विकसित केले होते. तर लसणाच्या या वाणाला जास्त उत्पादन देणारे वाण म्हणून ओळखले जाते.

जास्त कालावधीपर्यंत साठवणूक करता येणारे तसेंच कमीत कमी नुकसान होईल असे, आणि पांढऱ्या शुभ्र रंगाचे जास्त विद्राव्य घनपदार्थाचे प्रमाण असणारे गाठे असे हे वाण आहे.

महाराष्ट्रातील जमिनीसाठी विशेषता रब्बी हंगामासाठी या वाणाची शिफारस करण्यात येते. तर यापासून मिळणारे हेक्टरी उत्पादन हे ११९ क्विंटल पर्यंत आहे. लागवडी नंतर साधारणपणे १३० ते १३५ दिवसात काढणीसाठी तयार होते.

करपा रोगास हे वाण प्रतिकारक ठरते. तर फुलकिडीस मध्यम प्रतिकारक आहे. यामुळे रोगराई नियंत्रणासाठी करावा लागणारा खर्च देखील कमी प्रमाणात येतो. आणि पैशाची सुद्धा बचत होते.

तर ही माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहचवा. आणि अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा.

येथे क्लिक करा :- whatsapp.com

हेही वाचा: – ॲग्रीस्टेक योजना नेमकी आहे तरी काय ? त्याचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ? वाचा सविस्तर माहिती इथे..

गव्हाच्या या जाती ठरतात शेतकऱ्यांना फायदेशीर !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment