Government Employee News : या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 78 दिवसांचा पगार , बोनस म्हणून !

Government Employee News : या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 78 दिवसांचा पगार , बोनस म्हणून !
Government Employee News
Government Employee News

सध्या भारतात सणासुदीचा हंगाम सुरु झालेला आहे. गणपती नंतर आता काही दिवसांपासून शारदीय नवरात्रोत्सव देखील सुरु झालेला आहे.आता नवरात्रीच्या पाठोपाठ लगेचच विजयादशमी, दसऱ्याचा सण येणार आहे. आणि दसऱ्यानंतर दिवाळीचा मोठा सण येणार आहे . त्यामुळे आता देशभर आनंदाचे वातावरण असणार आहे.

दरम्यान शासनाकडून देखील सर्वसामान्यांसाठी योजना राबवल्या जात आहेत. आणि आता आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच रेल्वे विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारे दिवाळीचा बोनसच दिला जाणार आहे.

Government Employee News

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांचा बोनस जाहीर केलेला आहे.

रेल्वे विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या तब्बल ११ लाख ७२ हजार २४० कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्याचे काम शासन करणार आहे. ७८ दिवसांचा बोनस हा रेल्वे कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये एकूण २,०२९ कोटी रुपयांचा बोनस रेल्वे मंत्रालय विविध वर्गातील ११.७२ लाख कर्मचाऱ्यांना वितरित करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे.

किती बोनस मिळणार?

Government Employee News

रेल्वे मंत्रालयाने सांगितल्यानुसार रेल्वे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून जास्तीत जास्त १७,९५१ रुपये दिले जातील.

सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना, पदाची पर्वा न करता समानच बोनस दिला जातो. त्यामुळे यावेळी देखील रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाची पर्वा न करता समान बोनस मिळणार आहे.

अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..

येथे क्लिक करा 👉  Whatsapp

हेही वाचा: – महिलांना पुन्हा मिळणार 3,000 रुपये !

जाणून घ्या कार मधील Auto Hold Function म्हणजे काय ? आणि कसे काम करते

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment