Gram Farming : 23 क्विंटल पर्यंत उत्पादन देणाऱ्या सुधारित जातीपैकी एक ही आहे….
तर आजच्या लेखात आपण हरभऱ्याच्या अशा एका सुधारित जाती बद्दल माहिती घेणार आहोत. ज्या जातीतून शेतकरी बांधवांना हेक्टरी २४ क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवता येते.
राज्यात हरभऱ्याची लागवड ही मोठ्या प्रमाणावर हंगामात केली जाते. महाराष्ट्रातिल मराठवाडा, विदर्भ अशा अनेक जिल्ह्यांमध्ये हरभऱ्यांची शेती केली जाते. हरभरा पारंपारिक पीक असून, याची लागवड शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरते.(Gram Farming)
गेल्या वर्षात काही भागात शक्यतो हरभरा पेरला त्याठिकाणी कमी पाऊस असताना सुद्धा हरभऱ्याची लागवड चांगल्या प्रकारे झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला. परतीचा पाऊस सुद्धा महाराष्ट्रात चांगलाच पडला आहे .(Gram Farming)
मान्सूनोत्तर पावसाने सुद्धा राज्यात चांगलाचं धुमाकूळ घातल्याने रब्बी हंगामातील पिकांना यामुळे फायदा होणार आहे. यावर्षी रब्बी हंगामात गहू आणि हरभरा लागवडी खालील क्षेत्र वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हरभऱ्याचे सुधारित वाण :
(Gram Farming)
दिग्विजय :
दिग्वीजय हे वाण महाराष्ट्रात बरेच लोकप्रिय आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ जिल्ह्यातील अनेक शेतकरी प्रमुख हरभरा उत्पादक पट्ट्या मध्ये या जातीची लागवड करतात. ही जात जिरायती आणि बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये लागवडीसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे या जातीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या वाणाची जर का, जिरायती भागामध्ये लागवड केली तर या जातीचे पीक ९० ते ९५ दिवसामध्ये हार्वेस्टिंग साठी रेडी होते. तसेंच या जातीपासून जिरायती भागामधुन १४ क्विंटल हेक्टरी एवढे उत्पादन शक्य आहे.
तसेंच या वाणाची बागायती भागामध्ये लागवड झाली तर , ११० दिवसातच या जातीचे पीक व्हायला सुरूवात होते, तर साधारणपणे २३ क्विंटल पर्यंतचे उत्पादन यातून मिळू शकते.
या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे उशिरा पेरणीसाठी देखील या जातीची शिफारस करण्यात आली आहे. उशिरा पेरणी करूनही शेतकऱ्यांना या जातीपासून चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. तसेंच या जातीची उशिरा पेरणी केल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी २१ क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. असे जाणकारांनी सांगितले आहे . यासोबतच जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य असणारा हा वाण मर रोगास देखील प्रतिकारक ठरतो, असा दावा देखील कृषी तज्ञांनी कडून केला जातो.
तर तुम्हाला सुद्धा यावर्षी हरभरा लागवड करायची असेल तर तुम्ही या जातीची निवड नक्की विचार केला पाहिजे. कारण यामधून तुम्हाला चांगले उत्पादन मिळण्यास मदत होऊ शकते.
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.
हेही वाचा: – Garlic And Corn Crop Variety : मका आणि लसणासाठी वापरा हे वाण आणि मिळवा भरगोस उत्पादन..
Harbhara Niyojan : हरभऱ्याची अशी कराल 15 नोव्हेंबर आधी पेरणी तर मिळेल भरगोस उत्पन्न !