Harbhara Niyojan : हरभऱ्याची अशी कराल 15 नोव्हेंबर आधी पेरणी तर मिळेल भरगोस उत्पन्न !

Harbhara Niyojan : हरभऱ्याची अशी कराल 15 नोव्हेंबर आधी पेरणी तर मिळेल भरगोस उत्पन्न !
Harbhara Niyojan
Harbhara Niyojan

तर नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. तर तुम्ही सुद्धा आपल्या शेतात हरभरा पिकाचे उत्पादन घेण्याच्या तयारीत असाल तर हा लेख एकदा जरूर वाचा. आणि आपल्या शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा. तर मंडळी, कृषी तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांकडे पाण्याची योग्य व्यवस्था आहे त्यांनी आपल्या हरभऱ्याची पेरणी ही २० ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान केल्यास चांगला नफा मिळू शकतो. कृषी तज्ञांच्या असे मत आहे की, या कालावधीत हरभरा पेरणी केल्याने हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळते. तसेंच हरभऱ्यासाठी फायदेशीर असणाऱ्या पोषक हवामानाचा उपयोग या कालावधी मध्ये मिळू शकतो.

राज्यातील शेतकरी बांधव आता रब्बी हंगामाच्या तयारीला सुरुवात करित आहेत. तसेंच खरीप हंगामातील पिकांची काढणी सुद्धा सुरु झाली आहे. जसे की आपल्याला ठाऊक आहेच की, महाराष्ट्रात रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात मका, गहू , कांदा आणि हरभरा अशा पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते.(Harbhara Niyojan )

तर आज आपण हरभरा विषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये हरभरा पिक हे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे असे पीक असून कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळवणे या पिकाच्या माध्यमातून शक्य होते. तसे पाहायला गेले तर हा कालावधी हरभरा पेरणीचा आहे.

परंतु यावर्षी लांबलेल्या मान्सूनच्या परतीच्या प्रवासामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पडलेल्या पावसाने बऱ्याच भागातील शेतात पाणी साचून राहिले आणि यामुळे हरभऱ्याची पेरणी अजूनही होऊ शकली नाही. तरी सध्या बऱ्याच भागात काही प्रमाणात पाऊस थांबल्याचे दिसत आहे. यामुळे आता रब्बी पिकांच्या पेरणीला देखील वेग येण्याची शक्यता आहे.(Harbhara Niyojan )

तर तुम्ही देखील आता हरभरा पेरायच्या तयारीत असाल, आणि सिंचनाची व्यवस्था सुद्धा चांगली असेल तर तुम्ही येत्या १५ नोव्हेंबरच्या आधी हरभऱ्याची पेरणी करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा सल्ला कृषी तज्ञांद्वारे देण्यात येत आहे .(Harbhara Niyojan )

कृषी तज्ञांच्या माध्यमातून तुम्ही जर या कालावधीमध्ये हरभऱ्याची पेरणी केली तर, हरभऱ्याचे उत्पादन जास्त मिळण्यासाठी गरजेचे असणारे पोषक हवामान याच दिवसात मिळते.वाफसा या अवस्थेमध्ये हरभऱ्याची पेरणी पूर्ण करावी. यासोबतच तुम्ही निवडलेल्या वाणानुसार हेक्टरी बियाण्यांच्या वापराचे प्रमाण ठरवावे. उदाहरणार्थ जर हरभऱ्याची जी-12 या हरभरा वाणाची लागवडीसाठी निवड केली असेल तर हेक्‍टरी ७० किलो बियाणे पुरेसे ठरतात.

तर तुम्ही विश्वास व विजय या व्हरायटींची निवड केली असल्यास, तुम्हाला हेक्टरी ८५ किलो बियाणे वापरावे लागतात. तसेंच दिग्विजय आणि विशाल व विराट या व्हरायटिंची निवड केली असल्यास १०० किलो हेक्टरी बियाणे वापरावे लागतात.

अशा पद्धतीने करा नियोजन !

Harbhara Niyojan

हरभरा लागवड करित असताना प्रमाणित तसेंच खात्रीशीर बियाण्यांचा वापर करावा.

बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. यामध्ये प्रति किलो बियाण्याला दोन ते अडीच ग्रॅम कार्बनडेझीम अथवा २ ते २.५ ग्रॅम थायरम मिसळावे.

हरभऱ्याची पेरणी करण्याआधी १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम व स्फुरद जिवाणू संवर्धक चोळावे. त्यानंतर त्या बियाण्याला सावलीत सुकवून लगेचच पेरून घ्यावे.

यामध्ये हरभरा करडई आंतरपीक पद्धत वापरली तरी देखील चांगला परिणाम पाहायला मिळतो.

खतव्यवस्थापन करताना बागायती हरभऱ्याला पेरणी करण्याआधी प्रतिहेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३२ किलो पालाश हे जमिनीत पेरावे.

पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीच्या आत किती ओल आहे हे पाहून त्याप्रकारे नियोजन करावे.

साधारणपणे जमिनीतील ओल पाहून पहिले पाणी ३०/३५ दिवसांनी फांद्या फुटत असताना द्यावे. आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी हरभऱ्याला घाटे भरत असताना द्यावे.

तर् अशा पद्धतीनेच प्रत्येक वेळी योग्य प्रमाणात पाण्याचे व्यवस्थापन करावे. आणि जर जास्त पाणी दिले तर पिक उभळू शकते.

पेरणी झाल्यानंतर २१ दिवसांनी कोळपणी आणि एक खुरपणी करून पिक तणमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करावा.तसेंच गरज असेल तर हरभरा पीक फुलोऱ्यात येण्याआधि दुसरी खुरपणी सुद्धा करून घ्या.

तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही हरभऱ्याचे उत्पादन घेण्यासाठी नियोजन करू शकता. आणि चांगला नफा मिळवु शकता.

अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाटसॲप ग्रुपचे सदस्य व्हा. :- whatsapp.com

हेही वाचा: –  कोंबडीच्या पिसांपासून सुरु केला नवीन व्यवसाय !

Garlic And Corn Crop Variety : मका आणि लसणासाठी वापरा हे वाण आणि मिळवा भरगोस उत्पादन..

Agristack Yojana : ॲग्रीस्टेक योजना नेमकी आहे तरी काय ? त्याचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ? वाचा सविस्तर माहिती इथे..

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment