Ind vs Nz : रोहित आणि गंभीर वर चाहते का झाले नाराज ?
लवकरच भारत आणि न्यूझीलंडची तीन सामन्यांची कसोटी होणार आहे. तसेंच या कसोटी मालिकेकरिता बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा देखील केलेली आहे.
तसे पाहायला गेले तर, भारताच्या संघामत फारसे काही मोठे बदल करण्यात आलेले नाहीयेत. मात्र भारतीय संघामधून केवळ एका खेळाडूला बाहेर करण्यात आले आहे. बांगलादेश व भारतामधील दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली नाही.
त्यामुळे आता तर न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेतून त्याला बाहेर काढण्यात आल्यामुळे त्याचा चाहता वर्ग नाराज झाल्याचे दिसते आहे. नेमका आहे तरी कोण हा खेळाडू चला तर मग जाणून घेऊयात.
तर मंडळी, येत्या १८ ऑक्टोबर २०२४ पासूनच भारत आणि न्यूझीलंडमधिल कसोटी मालिकेला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे आता क्रिकेट प्रेमींना सुद्धा या मालिकेची उत्सुकता लागली आहे. एकूण १५ सदस्य असणारा संघ या मालिकेकरिता बीसीसीआयकडून जाहीर करण्याय आला आहे.
शिवाय मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशविरूद्धच्या मालिकेकरिता १६ सदस्य असणारा संघ तयार केला गेलाय.
तर वगळण्यात आलेला एक खेळाडू हा, तो वेगवान गोलंदाज ‘यश दयाल’ आहे. बांगलादेशविरूद्ध यश दयालची निवड झाली होती, परंतु त्याला प्लेइंग ११ मध्ये जागाच मिळाली नाही. त्यानंतर देखील झालेल्या दुसऱ्या कसोटी मध्ये सुद्धा दयालला संधी मिळू शकली नाही.
त्यानंतर मोहम्मद शमी याला दुखापत झाली असल्यामुळे यशची न्यूझीलंडविरूद्धही निवड होऊ शकते. अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
रणजी क्रिकेटमध्ये यश दयाल खेळणार आहे , त्यामुळे त्याला वगळण्यात आलं आहे. तर उत्तर प्रदेश संघाकडून हा यश दयाल खेळणार असल्याचे समोर आले आहे.
उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये होणाऱ्या सामन्यात यश दयालला खेळता यावे म्हणूनच त्याची मुख्य संघात निवड केली गेली नसावी. परंतु यामुळे त्याचा चाहता वर्ग रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीरवर नाराजी व्यक्त करीत आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात असणार हे खेळाडू :
रोहित शर्मा(कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उप कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, ऋषभ पंत, ध्रुव झुरेल, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
हेही वाचा:-
Ratan Tata Car Collection : या होत्या रतन टाटा यांच्या आवडत्या गाड्या !
BMW CE 02 : भारतात लॉंच झाली बीएमडब्ल्यू सीई 02 जाणून घ्या काय आहेत फिचर्स ?