India Post Recruitment 2024: GDS पदांसाठी 35 हजार जागांसाठी मेगा भरती सुरु…

India Post Recruitment 2024: GDS पदांसाठी 35 हजार जागांसाठी मेगा भरती सुरु…

पोस्ट ऑफिसमध्ये सुरु होणार 35 हजार पदांची भरती, दहावी पास असणाऱ्यांना करता येणार अर्ज…

India Post Recruitment 2024 : नमस्कार मंडळी आजच्या लेखात आपण पोस्ट ऑफिस च्या नवीन पदांच्या भरती बद्दल जाणून घेणार आहोत,  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा भारतीय डाक विभागाच्या अंतर्गत म्हणजेच पोस्ट ऑफिस द्वारे ही भरती राबवली जाते. नक्कीच सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरून मंडळींसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे.

ही भरती प्रक्रिया येत्या काही दिवसांतच सुरु होणार असून , आता नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींनी लवकरच तयारीला लागायला हवे . आणि खास गोष्ट अशी की , थेट केंद्र शासनाची नोकरी मिळवण्याची संधी तुमच्याकडे चालूल आहे. पोस्ट ऑफिसच्या या  भरती प्रक्रियेबद्दलची नोटीस नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 

अर्ज करण्यासाठी पात्रता काय असणार आहे ? जाणून घ्या इथे…India Post Recruitment 2024 

पोस्ट ऑफिस भरतीसाठीचा अर्ज करण्याकरिता  तुम्ही दहावी पास असणे गरजेचे आहे. कोणत्याही दहावी उत्तिर्ण उमेदवाराला आपल्या राज्यातून अर्ज करता येणार आहे. 

ही भरती प्रक्रिया भारतीय डाक विभागा द्वारे राबवली जात असते. दरवर्षी हजारोच्या संख्येने तरुण अर्ज करत असतात. तर मग उशीर न करता तुम्ही सुद्धा लगेचच भरती प्रक्रियेच्या तयारीला लागा. तरुण वर्ग तसेंच पार्ट टाईम जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी  खरोखरच ही एकप्रकारी सुवर्णं संधीच आहे.

India Post Recruitment 2024
India Post Recruitment 2024

बऱ्याच लोकांचे स्वप्न असते सरकारी नोकरी करायचे किंवा भारतीय डाक विभागात नोकरी मिळावे असे,  आणि आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते.

तर वाचकहो चला तर मग जाणून घेऊयात या या भरती प्रक्रियेबद्दल आणखी सविस्तर माहिती  आणि भरती साठी अर्ज करण्याची सोप्पी पद्धत.(India Post Recruitment 2024 )

वयोमर्यादा

18 ते 40 वयोगटापर्यंतच्या उमेदवारांना पोस्ट ऑफिसच्या भरती प्रक्रिये करिता अर्ज करता येणार आहे. तसेंच यामध्यें काही प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाच्या अटी मध्ये थोड्या प्रमाणात  सूट देण्यात आली आहे . 

Post office bharti 2024
Post office bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत –

भारतीय डाक विभागाने GDS म्हणजेच  ग्रामीण डाक सेवकाच्या जागांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे . तसेंच ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरती असणार आहे . या भरतीची नोटीस नुकतीच आपल्या अधिकृत वेबसाइट वर  प्रसिद्ध केली आहे. तिथे देखील तुम्ही या प्रकीये बद्दल सविस्तर माहिती पाहू शकता. विशेष म्हणजे ही भरतीची प्रक्रिया ही 15 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. आणि सविस्तर माहिती देखील तुम्हाला येत्या काही दिवसांतच मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी आरामात अर्ज करता येणार आहे . अर्ज करण्याची लिंक ओपन झाल्यानंतरच उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. 

भारतीय डाक विभागाच्या  या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त ऑनलाईन पद्धतीने एक अर्ज ही करावा लागतो. ज्या करिता आपल्या कडून 100 रुपये आकारले जातात. तसेंच SC किंवा ST प्रवर्गातील महिलांकडून ही १०० रुपयांची फीस् आकारली जात नाही. 

 http://indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ह्या भरतीसाठी अर्ज करू शकता. आणि त्या ठिकाणीच आपल्याला भरती प्रक्रिये बद्दलची सविस्तर माहिती मिळेल. 

हे लक्षात घ्या-  अर्ज करण्यासाठी लिंक अद्दाप  सुरू झाली नसुन , 15 जुलैनंतर तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार आहे.India Post Recruitment 2024 

आता  GDS या रिक्त पदांसाठीच शॉर्ट नोटीस जारी करण्यात आलेली आहे . तसेंच या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलेली आहे . दहावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यासोबतच  उमेदवाराला संगणकाचे ज्ञानही असणे गरजेचे आहे आणि याव्यतिरिक्त  उमेदवाराला सायकल सुद्धा चालवता येणे गरजेचे आहे.(India Post Recruitment 2024 )

यावर्षी सर्वाधिक पदांसाठी म्हणजेच 35 हजारांपेक्षाही जास्त पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे . या मधील उमेदवारांची निवड ही त्यांच्या दहावी गुणवत्तेच्या आधारावर केली जात असते. तसेंच भरती साठी कोणतीही परीक्षा देखील द्यावी लागत नाही. अर्ज करत्या वेळी उमेदवारांना केवळ 100 रुपये फीस भरावी लागेल. प्रर्वगातील उमेदवाराकडून ही फीस आकारली जात नाही. 

पार्ट टाईम जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी फायदेशीर  – मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षा किंवा इतर शिक्षण घेत असाल. आणि तुम्हाला पार्ट टाईम जॉबची गरज असेल, तर तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये GDS पदावर काम करता येऊ शकते,  कारण तुमची ड्युटी चार ते पास तास इतकी असते. त्यानंतर तुमच्या कडे बराच वेळ शिल्लक राहतो.

आशा करतो आजचा हा लेख नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल, अशेच नवनविन् आणि फायदेशीर लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला subcribe करा, आणि हा लेख तुमच्या गरजूवंत मित्र मंडळीं पर्यंत पोहचवा..

हेही वाचा

MJPJAY GR : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना , नवीन निधी मंजूर !

Bandhkam Kamgar Yojana 2024 : राज्यातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी, मिळणार ५,००० रुपये !

घरी बसून काम पाहिजे ? जाणून घ्या ५ प्रकारचे व्यवसाय !

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment