Indian Railway Jobs 2024 Apply Online : बारावीनंतर रेल्वेत नोकरी कशी मिळते ? कर्मचाऱ्यांना पेन्शनपासून ते मोफत प्रवासापर्यंत अनेक सुविधा दिल्या जातात.

Table of Contents

Indian Railway Jobs 2024 Apply Online :

बारावीनंतर रेल्वेत नोकरी कशी मिळते ? कर्मचाऱ्यांना पेन्शनपासून ते मोफत प्रवासापर्यंत अनेक सुविधा दिल्या जातात.

नमस्कार मंडळी प्रभात मराठीवर आपले स्वागत आहे. प्रभात मराठीच्या माध्यमातून आपण नेहमीच शासकीय योजना , शेती आणि नोकरी विषयक महत्त्वपूर्ण लेख वाचकापर्यंत पोहचवण्याचे काम करत असतो. तर आजच्या या लेखात सुद्धा आपण नोकरी संदर्भातील आढावा घेणार आहोत.

सरकारी नोकरीसाठी तयारी करणारे तरुण रेल्वेला बरेच प्राधान्य देतात, कारण रेल्वे मध्ये नोकरी करण्याचे अनेक फायदे आहेत. फक्त 12 वी पास तरुण मंडळी सुद्धा रेल्वे मध्ये नोकरीसाठी तयारी करू शकतात.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तयारी करणारे तरुण रेल्वे विभागाला प्रथम प्राधान्य देतात. तस पाहायला गेलं तर, रेल्वेमध्ये अनेक स्तरांवर भरती होत असते. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) आणि रेल्वे रिक्रूटमेंट सेल म्हणजेच (RRC) यांसारख्या संस्था रेल्वेमध्ये भरती काढत असतात.

बऱ्याच मंडळींची रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते, परुंतु अर्ज त्यांना अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया माहित नसते. त्यामुळे बऱ्याचदा ते वंचित राहतात. त्यामुळे याबद्दलची अर्ज प्रक्रिया माहित असणे आवश्यक असते. प्रभात मराठीच्या माध्यमातुन आम्ही रेल्वेच्या तसेंच इतर अनेक नोकरीच्या जाहिराती प्रसिद्ध करित असतो, त्यामुळे तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतील.

रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे फायदे 
Indian Railway Jobs 2024 Apply Online
Indian Railway Jobs 2024 Apply Online

Indian Railway Jobs 2024 Apply Online
क्रीडा कोट्याअंतर्गत सरकारी नोकऱ्या मिळवणारे बरेच उमेदवार हे रेल्वेला प्राधान्य देताना पाहायला मिळतात. रेल्वेची नोकरी फार सुरक्षित मानली जाते. अत्यंत कठीण परिस्थिती असल्याशिवाय रेल्वेत काम करणाऱ्या लोकांना नोकरीवरून काढले जात नाही. रेल्वेमध्ये अशी अनेक पदे आहेत, ज्यामध्ये 12 वी पास तरुणांना देखील संधी दिल्या जातात. तुम्ही देखील रेल्वेमध्ये नोकरीसाठी तयारी करत असाल, तर सर्व फायदे आणि संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या आजच्या या लेखाच्या माध्यमातुन.

(Indian Railway Jobs 2024 Apply Online )

१. रेल्वेची नोकरी अतिशय सुरक्षित नोकरी मानली जाते. त्यावर मंदीचा परिणाम होत नाही आणि कोणालाही लवकर नोकरीतून काढून टाकले जात नाही, तसेंच कर्मचाऱ्याला काही झाल्यास त्याची नोकरी पत्नी, मूल किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला दिली जाते.

२. राहणे आणि प्रवास मोफत-
रेल्वे कर्मचाऱ्यांना ट्रेनने मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येते. काही ठिकाणी भाडे आकारलेच तरी ते कमी प्रमाणात असते.यासोबतच ज्या कर्मचाऱ्यांना रेल्वे क्वार्टर मिळू शकत नाहीत, अशांना HRA म्हणजेच घरभाडे भत्ता देखील दिला जातो.(Indian Railway Jobs 2024 Apply Online )

३. चांगले वेतन :
रेल्वेतील प्रिन्सिपल चीफ इंजिनीअरचा पगार हा किमान 50-56 लाख वार्षिक असू शकतो.
तसेंच टॉप 10 टक्के कर्मचाऱ्यांचा पगार 14 लाख रुपयांपर्यंत असतो. आणि टॉप 1 टक्क्यांचा पगार हा 40 लाख रुपयांपर्यंत असतो. याशिवाय पगारी रजा रोखून घेण्याची सुविधा देखील उपलब्ध असते.

४. खेळांना प्राधान्य-
क्रीडापटू व्यक्तींना रेल्वेकडून खेळण्याची संधी देखील दिली जाते. जे कर्मचारी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात, त्यांना रेल्वे विभाग त्यांच्या अभ्यासात मदत करतो आणि काही प्रकरणांमध्ये खर्च देखील उचलतो.

५. मोफत उपचार :
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा खर्च रेल्वे विभाग उचलत असतो. तुम्ही आपल्या उपचाराकरिता रेल्वे रुग्णालयात जाऊ शकता. तेथे आजाराप्रमाणे उपचार उपलब्ध नसल्यास बाहेरून उपचार करून घेण्याचा खर्च देखील रेल्वे उचलते.

(Indian Railway Jobs 2024 Apply Online )

रेल्वेत नोकऱ्यांची वयोमर्यादा काय असते ?

कनिष्ठ टाइमकीपर, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, लेखा लिपिक सह टंकलेखक, ट्रेन लिपिक आणि कमर्शियल कम तिकीट लिपिक यांसारखी काही पदे 12 वी पास उमेदवारांकरिता राखीव असतात.

(Indian Railway Jobs 2024 Apply Online)

18 ते 30 वयोगटातील तरुण या पदांसाठी उपस्थित राहू शकतात. आरक्षित प्रवर्गासाठी वयात सवलत देण्याची तरतूद आहे. RRB NTPC मध्ये नोकरीसाठी, हिंदी, इंग्रजी आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे असते.

नोकरीसाठी अर्ज कसा करावा लागतो ?

रेल्वे भर्ती बोर्ड विविध झोननुसार रिक्त जागांची अधिसूचना जारी करत असते. तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी RRB च्या विभागीय किंवा प्रादेशिक वेबसाइटवर लॉग इन करावे लागते आणि NTPC पदांसाठी अर्ज करावा लागतो. फॉर्म भरल्यानंतर, तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करुन विहित पेमेंट करावी लागते. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र देण्यात येते.

रेल्वे परीक्षा पॅटर्न:

RRB NTPC पदांसाठी अनेक टप्प्यांत पात्र उमेदवारांची भरती केली जाते. त्यातील काही टप्पे खालीलप्रमाणे.

पहिला टप्पा :
संगणक आधारित चाचणी (CBT): यासाठी २ तास दिले जातात. यामध्ये 100 प्रश्न विचारले जातात. यात सामान्य जागरुकतेवर 40 प्रश्न, परिमाणात्मक योग्यतेवर 30 प्रश्न आणि तर्कशक्तीवर 30 प्रश्न असतात.
दुसरा टप्पा :
संगणक आधारित चाचणी (CBT): यासाठी देखील 2 तास देण्यात येतात. यामध्ये 120 प्रश्न विचारले जातात – 50 प्रश्न सामान्य जागरूकताचे आणि 35 प्रश्न परिमाणात्मक योग्यतेचे आणि 35 प्रश्न तर्कशास्त्राचे.

काही पदांसाठी टायपिंग चाचणी असते.
कनिष्ठ लेखा सहाय्यक, खाते लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यांसारख्या पदांच्या भरतीसाठी टायपिंग कौशल्य चाचणी देणे अनिवार्य असते. टायपिंग कौशल्य चाचणीमध्ये उमेदवाराला कोणत्याही बाह्य सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय किमान 30 शब्द प्रति मिनिट इंग्रजी किंवा 25 शब्द प्रति मिनिट हिंदीमध्ये टाइप करावे लागतात. RRB पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी टायपिंग कौशल्य सेटचे गुण जोडत नाही. हे केवळ पात्रतेची चाचणी घेण्यासाठी घेतले जातात.

(Indian Railway Jobs 2024 Apply Online )

यांसोबतच वैद्यकीय चाचणी देखील घेण्यात येते.
लेखी CBT परीक्षा, संगणक आधारित अभियोग्यता चाचणी आणि टायपिंग कौशल्य चाचणी, उमेदवार वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच रेल्वेमध्ये नोकरी मिळवता येते.

तर मंडळी ही माहिती आवडल्यास आपल्या गरजू मित्रांपर्यंत  नक्की पाठवा , आणि अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा.. 

 येथे क्लिक करा 👉👉 प्रभात मराठी >> Whatsapp

हेही वाचा:  Indian railway recruitment 2024 Apply online : भारतीय रेल्वे मध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज !

Nabard Requirement 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत नोकरीची सुवर्णं संधी..वाचा इथे !

Saur krushi vahini Yojana 2.0: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मान्यता..

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : राज्यातील सुशिक्षित पंरतू बेरोजगार तरुणांसाठी सरकार देणार 10 हजार स्टायपन

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment