Jan Arogya Yojana : 2024 मोठी घोषणा ,राज्यातील गरजूंना मिळणार मोफत उपचार…

Jan Arogya Yojana: मोठी घोषणा ,राज्यातील गरजूंना मिळणार मोफत उपचार..

महाराष्ट्र राज्यातील दुर्बल तसेच गरीब घटकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील काही घटकांना शासनाद्वारे मदत व्हावी यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे.

Arogya Yojana या योजनेअंतर्गत राज्यातील गरजूंना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे. म्हणजेच या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिले जाणार आहेत.

गरीब व गरजू रुग्णांना मदत व्हावी तसेच त्यांना या योजनेचा लाभ मिळावा, हा उद्देश शिंदे सरकारचा आहे. त्यामुळे आता गरजू रुग्णांचा त्यांच्या उपचारावर होणारा खर्चही वाचणार आहे. (Jan Arogya Yojana)

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार , आता राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये अनेक प्रकारचे उपचार हे मोफत होणार आहेत.

सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये ही योजना राबवली जात असून सध्या या योजनेद्वारे दरवर्षी 2.55 कोटी रुग्णांनी उपचार घेतले आहेत.गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारद्वारे या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.(Jan Arogya Yojana)

Jan Arogya Yojana
Jan Arogya Yojana

याआधी जन आरोग्य योजनेचा लाभ हा पिवळा शिधापत्रिकाधारक, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक व केशरी शिधापत्रिकाधारकांना दिला जात होता. यामध्ये कृषी संकटाचा सामना करणाऱ्या १४ जिल्ह्यांतील पांढरे शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांचाही समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने, आता सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवांचा व्यापक प्रवेश सुनिश्चित केला जाणार आहे.

हेही वाचा:

MJPJAY GR : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना , नवीन निधी मंजूर !

Vidhwa Pension Yojana Maharashtra Apply online : विधवा महिलांना मिळणार दोन हजार रुपये महिना !

Mumbai Local Train Update today : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार आणखी सोप्पा

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment