Kadba kutti machine Yojana 2024 Maharashtra : कडबा कुट्टी मशीन योजना 2024 महाराष्ट्र.
नमस्कार मंडळी प्रभात मराठी वर आपले सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी प्रभात मराठीच्या माध्यमातून आपण शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या नवनवीन योजना तसेंच नोकरी संदर्भातील अपडेट पाहत असतो. तर आजच्या या लेखात सुद्धा आपण अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेबाबत माहिती जाणून घेणार आहोत.(Kadba kutti machine Yojana 2024 Maharashtra)
राज्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक पाठबळ मिळावे याकरिता शासन अनेक योजना राबवत असते , अशीच एक योजना म्हणजे ‘कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना'(Kadba kutti machine Yojana 2024 Maharashtra). तर आजच्या लेखात आपण योजने करिता कोण पात्र असेल, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज प्रक्रिया कशी असणार ? तसेंच या योजने बद्दलची उद्दिष्टे जाणून घेणार आहोत.
[Ration card Update : 1 ऑगस्ट पासून रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम !]
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेची वैशिष्ट्ये
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना 2024 अंतर्गत, सरकार द्वारे कुट्टी मशीनसाठी राज्यातील शेतकरी बांधवांना 20,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
कुट्टी मशीन अनुदानाची ही रक्कम शासनाकडून महा DBT द्वारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
सदर योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधव स्वयंचलित तसेंच हाताने चालणारी मळणी मशीन खरेदी करू शकतात.
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेचा लाभ घेतल्याने शेतकऱ्यांना , पशुपालकांना आपल्या जनावरांकरिता चांगल्या आणि विविध प्रकारचा चारा बनवणे सोप्पे होणार आहे. (Kadba kutti machine Yojana 2024 Maharashtra)
या मशीनच्या माध्यमातूनच हिरवे गवत, भरड पावडर आणि बारीक चारा सहज बनवता येणार आहे.त्यामुळे गरज असणाऱ्या शेतकऱ्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्यायला हवा.
कुट्टी मशीनचा लाभ घेण्यासाठी, कोणत्याही पात्र शेतकरी किंवा पशुपालकांना ऑनलाईन तसेंच ऑफलाईन अर्ज करता येणार आहे. तर आजच्या या लेखात आपण ऑनलाईन अर्ज कसा करता येईल या बद्दल माहिती घेणार आहोत.
(Kadba kutti machine Yojana 2024 Maharashtra)
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेची उद्दिष्टे :
राज्यातील शेतकरी बांधवांचा वेळ आणि अधिक श्रम कमी व्हावे हेच कडबा कुट्टी मशीन योजनेचे मुख्य उद्दिष्ठ आहे. कडबा कुटी मशीनच्या मदतीने जनावरांना लागणारा हिरवा चारा बारीक करता येतो. इतकेच नव्हे तर तो चारा शेतकऱ्यांना उन्हाळ्या मध्ये देखील वापरता येईल अशा पद्धतीने त्याच्या शेतकऱ्यांना नियोजन करता येणार आहे. त्यामुळे ही मशीन नक्कीच शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे.(Kadba kutti machine Yojana 2024 Maharashtra)
बरेच शेतकरी बांधव शेती सोबतच जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात,त्याकरिता शेतकऱ्यांना आपल्या गाई म्हशीसाठी योग्य चाऱ्याची गरज भासते अशावेळी चारा कापण्यासाठी, बारीक करण्यासाठी शेतकरी बांधवांना विशेष मेहनत घ्यावी लागत असते. या सर्व गोष्टींचा विचार करून या मशीनची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळेच कडबा कुट्टी मशीनच्या माध्यमातून राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचु शकणार आहेत.
(Kadba kutti machine Yojana 2024 Maharashtra)
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक पात्रता :
तर मंडळी जसे की आपल्याला ठाऊक असेलच, कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास काही पात्रता आणि नियम अटींची पूर्तता करावी लागते. या योजनेसाठी देखील काही आवश्यक पात्रता असणार आहे. ती पुढीलप्रमाणे आहे.
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेचा लाभ घेण्याकरिता तुम्हाला तुम्हाला खाली दिलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता ग्रामीण भागातील शेतकरी बांधव पात्र ठरवले जातील.
कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा.
योजनेसाठी अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर ते आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यावश्यक आहे.
अर्ज करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाख रुपयांच्या आत म्हणजेच 2 लाखा पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असायला हवी.
अर्जदार शेतकरी अथवा पशुपालकाकडे कमीत कमी दोन गायी किंवा म्हशी असणे गरजेचे आहे.
योजनेकरिता आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
- अर्जदाराचे बँक पासबुक
- अर्जदाराचा चालू मोबाईल नंबर
- अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो
- जमिनी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे
- कुट्टी मशीनचे बिल,पावती
- पत्त्याचा पुरावा
योजनेसाठी असा करता येणार अर्ज :
या लेखात आपण ऑनलाईन अर्ज कसा करावा हे पाहणार आहोत.
- अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरून किंवा कॉम्पुटर द्वारे महाडिबिटीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- महाडिबिटीच्या अधिकृत वेबसाईट वर आल्यानंतर आपल्या सानोर वेबसाईटचे होम पेज ओपन होईल.
- होम पेजवर आल्यावर तुम्हाला ,नवीन नोंदणीच्या पर्याय दिसत असेल ,यावर क्लिक करावे.
- नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्या समोर आणखी एक नवीन पेज उघडेल इथे तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजनेचा पर्याय दिसेल यावर किल्क करायचे आहे .
- आता तुमच्या समोर अर्ज करण्यासाठीचा फॉर्म ओपन होईल.
- या अर्जा मध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरित्या भरून घ्यावी.
- त्यानंतर सांगितलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
- आणि शेवटी सबमिट या पर्यावर क्लिक करून फॉर्म सबमिट करावा.
फॉर्म सबमिट केल्या नंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक प्राप्त होईल. जो तुम्हाला पुढे कामी येणार आहे. त्यामुळे तो लक्षात ठेवा. किंवा लिहून घ्या.
तर मंडळी ही होती ‘कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेची’ संपूर्ण प्रक्रिया.
(Kadba kutti machine Yojana 2024 Maharashtra)
माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहचवा ! आणि अशाच नवनवीन योजना अपडेड साठी व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा…
[••प्रभात मराठी _व्हाट्सअप ग्रुप ••]
हेही वाचा:
काजू बी शासन अनुदान योजना : काजु उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर