Kapus Soyabean Anudan :- दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बीड जिल्ह्यातील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनादरम्यान गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कपाशी तसेंच सोयाबीनची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार मार्फत प्रति हेक्टरी ५,००० रुपयांचे वाटपासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टलचे अनावरण या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित असलेले केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या वर्षाच्या खरीप हंगामा मध्ये सोयाबीन आणी कापसाचे दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना बरेच नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा किंवा नुकसान भरपाई पोटी प्रति हेक्टरी ५,००० रुपये मदत करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. आणि त्यानुसारच आता किमान १,००० रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादे मध्ये जास्तीतजास्त १०,००० रुपये याप्रमाणे आर्थिक सह्हाय देण्यात येत आहे. यासोबतच या निधीसाठी राज्य शासन ४ हजार १९४ कोटी ६८ लाख रुपये खर्च करणार आहे. यामधील १ हजार ५४८ कोटी ३४ लाख रुपये कापूस उत्पादकांसाठी तसेंच २ हजार ६४६ कोटी ३४ लाख रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी देणार आहे.
निधी मिळाला की नाही असे तपासा ऑनलाईन
Kapus Soyabean Anudan ;
कापूस व सोयाबीन पिकांची मदत मिळाली की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या अनुदानाच्या वेबसाईटवर जावे लागेल.
https://scagridbt.mahait.org
सर्वप्रथम वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूलाच वरच्या भागातील लाल चौकोनात Disbursement Status हा पर्याय दिसेल यावर क्लिक करायचे आहे.
आता तुमच्या समोर नवीन Disbursement स्टेटस चे पेज ओपन होईल ज्या मध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून गेट आधार ओटीपी करायचे आहे. Get Adhar OTP (Kapus Soyabean Anudan)
तर अशा प्रकारे तुमच्या समोर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपडेट संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या समोर दिसेल.
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा..>>>>chat.whatsapp.
हेही वाचा; Namo Shetkari Yojana 5th Installment Date : नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता सुद्धा लवकरच
या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, कापूस सोयाबीन अनुदानचे पैसे !
Pik Vima Yojana : 2023 मधील खरीप पीक विमा रक्कम अजूनही शेतकऱ्यांना नाही !