Kapus Soyabean News : केंद्र शासनाच्या या निर्णयाने मिळणार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ! या प्रकारच्या सोयाबीनची होणार हमीभावाने खरेदी…
केंद्रांवर ज्या सोयाबीनची ओलावा मर्यादा १२% आहे किंवा फक्त १२% ओलावा असलेल्या सोयाबीनचीच खरेदी केंद्रांवर करण्यात येत होती. पण आता सोयाबीनमधील ओलावा मर्यादा १२ टक्क्यांवरून थेट १५% करण्याचा निर्णय केंद्र शासनाद्वारे घेण्यात आलेला आहे. आणि यामुळेंच आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच एकप्रकारे दिलासा मिळणार आहे. मागील वर्षापासून अतिशय कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याचे दिसून आले.(Kapus Soyabean News)
आणि यावर्षात सुद्धा सोयाबीनचे दर घसरलेलेच् असल्यामुळे अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा देखील कमी दरात सोयाबीनची खरेदी केली जातेय. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोयाबीनची हमीभावाने खरेदी करता यावी यासाठी राज्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले. आणि त्यानुसार काही ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र या केंद्रांवर ज्या सोयाबीनच्या ओलाव्याची मर्यादा १२% आहे अथवा १२% ओलावा असलेल्या सोयाबीनचेच खरेदी या केंद्रांवर केली जात होती. परंतु आता सोयाबीनमधील ओलावा मर्यादा १२ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारद्वारे घेण्यात आला. यामुळे नक्कीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
Kapus Soyabean News
राज्यभरात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असतानाच केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने रविवारी १५ % ओलावा असलेल्या सोयाबीनची देखील खरेदी हमीभावाने करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या कडून मिळाली आहे. यासोबतच यासंदर्भातील आदेश हा केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून जारी केला गेला आहे. यामुळे आता ए वन कॉलिटीचे सोयाबीनच नव्हे तर सर्वच प्रकारच्या सोयाबीनची खरेदी हमीभावाने करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्या सूचना
Kapus Soyabean News
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रश्नांवर विशेष सूचना दिल्या असून त्यामध्ये त्यांनी राज्यात सोयाबीनचे खरेदीकेंद्र वाढवून सोयाबीनची खरेदी ४८९२/- रुपयांनी केली जाईल असे जाहीर केले आहे.
यासोबतच कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्यासोबतच खरेदी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून देण्यात आल्या आहेत. तसेंच खरेदी केंद्रांवर आवश्यक त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. केंद्र सरकारने कापूस आणि सोयाबीन हमीभावामध्ये याआधी देखील वाढ केलेली आहे. परंतु यावेळी खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती, आणि त्यांच्या कडून सुद्धा आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याने राज्यात खरेदी केंद्रांची संख्या वाढेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
मध्यम धागा कापूस ७१२१/- रुपये प्रति क्विंटल, लांब धाग्याचा कापूस ७५२१/- रुपये प्रतिक्विंटल असे हमीभाव २०२४-२५ करिता जाहीर करण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेने यामध्ये ५०१/- रुपयांनी वाढ दिसत आहे. कापूसच नाहीतर सोयाबीन पिकाच्या हमीभावात सुद्धा वाढ करण्यात आली आहे.
अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रभात मराठीच्या व्हाटसॲप ग्रुपचे सदस्य व्हा.
येथे क्लिक करा :- whatsapp
हेही वाचा: annasaheb patil loan Scheme : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना नेमकी आहे तरी काय ? कसा कराल अर्ज ?
ॲग्रीस्टेक योजना नेमकी आहे तरी काय ? त्याचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ? वाचा सविस्तर माहिती इथे..