Kapus Soyabin Anudan : या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, कापूस सोयाबीन अनुदानचे पैसे !

Kapus Soyabin anudan : या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, कापूस सोयाबीन अनुदानचे पैसे !

नमस्कार शेतकरी बांधवांनो जसे की आपल्याला कल्पना असेलच की राज्यात कापूस आणि सोयाबीन पिकांचा शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. गेल्या वर्षी झालेल्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेंच इतर कारणांमुळे पिकांतील किंमती मध्ये बरीच घसरण झाली , त्यामुळे शेतक-यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.

Kapus Soyabin Anudan
Kapus Soyabin Anudan

हिच बाब लक्षात घेऊन, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतक-यांना दोन हेक्‍टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

Kapus Soyabin Anudan 

यामध्ये २०२३ मधील खरीप हंगामातल्या ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना ०.२ सरसकट रु.१००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला दिनांक ११ जूलै, २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

सदर योजनेत महाराष्ट्र राज्यातील ज्या कापूस तसेंच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी अँप/पोर्टलट्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंदणी केलेली आहे , अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

चला तर मग जाणून घेऊयात कधी मिळणार कापूस व सोयाबीन अनुदानाची रक्कम?

Kapus Soyabin Anudan 

यासोबतच सदर योजनेकरिता ४,१९४ कोटी रुपयांचा जो निधी देण्याचे ठरवले आहे, तो या खात्यावर जमा केला जाणार आहे , आणि त्यानंतरच अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे.

आम्हाला मिळाल्या माहितीनुसार, सोयाबीन व कापूस उत्पादक आणि पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना योजनेचे अनुदान हे लवकरात लवकर मिळावे याकरिता कृषी विभाग सध्या ॲक्शन मोड मध्ये काम करत आहेच, मात्र संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता आणखी थोडा कालावधी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच दिनांक २ ते ५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पात्र शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे .

त्यामुळं शेतकऱ्यांनी कसलीही घाई करू नये, शिवाय कृषी विभागामध्ये आपले संमतीपत्र तसेंच ना हरकत प्रमाणपत्र कृपया भरून देण्यास सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विभागांतर्गत केले जात आहे.

ही माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहचवा, आणि अशाच अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा..👉 येथे क्लिक करा  

हेही वाचा: Kadba kutti machine Yojana 2024 Maharashtra : कडबा कुट्टी मशीनसाठी मिळणार अनुदान, जाणून घ्या अर्जप्रक्रिया..

Gai mhashi Vatap Yojana 2024 : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकार करणार दुधाळ गाई म्हशींचे वाटप; वाचा काय आहे प्रकल्प !

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment