Kapus Soyabin anudan arj : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अनुदान, असा करा अर्ज !
शेती उत्पादनामध्ये कापूस व सोयाबीन पिके देखील महत्त्वाची पिके मानली जातात. गेल्या वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेंच इतर कारणांस्थव किंमतीत झालेल्या मोठया घसरणीमुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
याच गोष्टी लक्षात घेऊन शासनाने, राज्यातील शेतक-यांना दिलासा मिळावा याकरिता खरीप हंगाम 2023-24 या वर्षात कापूस व सोयाबीनचे पीक घेणाऱ्या शेतक-यांना 2 हेक्टरच्या मर्यादे मध्ये प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राकरिता त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5,000 रुपये (२ हेक्टरच्या मर्यादेत) आर्थिक सहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या 11 जूलै, 2024 मध्ये झालेल्या बैठकीत या मान्यता दिली आहे.
Kapus Soyabin anudan arj
त्याअनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती, त्याबाबत शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे.
आर्थिक सहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 रुपये कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱयांसाठी 2,646.34 कोटी अशा एकूण 4194.68 रुपये कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राकरिता तसेच त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5000 रुपये (२ हेक्टरच्या मर्यादेत) आर्थिक सहाय्य करण्यास मान्यता देत आहे.(Kapus Soyabin anudan arj )
तर मंडळी सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे पात्रतेचे निकष खालील प्रमाणे आहेत.(Kapus Soyabin anudan arj )
महाराष्ट्र राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 मधील खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी अँप द्वारे कापूस आणि सोयाबीन लागवडीची नोंद केलेली आहे. हेच नोंदणीकृत शेतकरी या योजनेस पात्र ठरतील. यासोबतच ई-पीक पाहणी अँप/पोर्टल वर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार आणि त्याप्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय असेल.
सदर योजना फक्त सन 2023 मधील खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादीत असणार आहे.
सदर अर्थसहाय्याचे वितरण हे शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणांच्या म्हणजेच (DBT) माध्यमातून केले जाणार आहे.
याच अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्याकरिता शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमती पत्राचा नमुना यासोबतच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरीत करण्याच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या ना हरकत पत्राचा नमुना सोबत देण्यात आला आहे.
असा करा अर्ज :
तर मंडळी या योजनेस पात्र शेतकरी बांधवांनी खालील प्रमाणे देण्यात आलेला अर्ज व्यवस्थित भरून आपल्या भागातील कृषि विभागाच्या कार्यालयात सूचना प्राप्त झाल्यानंतर सादर करावेत.
अर्ज सादर करत्या वेळी त्यासोबत आधार कार्ड झेरॉक्सची प्रत जोडावी. आधार वापराबाबत संमतीपत्र आणि सामायिक खातेदार नाहरकत पत्र खालील प्रमाणे देण्यात आली आहे . तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता.
संमती पत्र : येथे क्लिक करा.
नाहरकत पत्र : येथे क्लिक करा.
हेही वाचा: कापुस सोयाबीन उत्पादक : शेतकऱ्यांना मिळणार , प्रती हेक्टर 5000 रुपये अनुदान !
100% अनुदानावर मिळणार कापूस वेचणी बॅग ! असा करा अर्ज