Ladki Bahin Yojana 1st installment Date : या तारखेलाच जमा होणार पहिला हप्ता !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आणि आत्ता पर्यंत या योजनेसाठी 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. राज्य सरकारने अर्ज करण्याची मुदत वाढून दिल्याने आणखी बरेच अर्ज प्राप्त होणे सुरूच आहे . त्यातच, पहिला हप्ता कधी जमा होणार , याची अर्ज केलेल्या महिलांना बरीच उतसुक्ता होती परंतु आता प्रतीक्षा संपली आहे.कारण राज्यसरकारने येत्या १७ ऑगस्ट २०२४ या तारखेलाच योजनेचा पहिला हफ्ता म्हणजेच ३,००० रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची घोषणा केली आहे.(Ladki Bahin Yojana 1st installment date)
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या आधीच ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.
१७ ऑगस्ट रोजी राज्य सरकार द्वारे खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आणि या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातूनच हे पैसे वितरीत केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे . या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहेत, तसेंच प्रत्येक जिल्ह्यातिल पालकमंत्री सुद्धा कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. १७ ऑगस्टला २ ते २.५ कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भात राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मिळाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे.(Ladki Bahin Yojana 1st installment date )
ज्या महिलांचे अर्ज काही त्रुटी आढल्यामुळे नामंजूर झाले आहेत ,त्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे.
आतापर्यंत शासनाकडे १ कोटी ४० लाख अर्ज आले असून, त्यापैकी 1 कोटी अर्जांची छानणी पूर्ण झाली आहे. तसेंच प्रलिंबीत अर्जामधील त्रुटी दुरुस्त करून ते अर्ज देखील मंजूर केले जाणार आहेत.
अशाच नवनवीन अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा.. chat.whatsapp.com
Annapurna Yojana Scheme : 3 गॅस सिलेंडर मोफत मिळवण्याआधी करावे लागणार हे काम !