Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांचा हप्ता कधी पासून मिळणार ?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2,100 रुपयांचा हप्ता कधी पासून मिळणार ?
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

विधानसभा निवडणुका सुरु होण्याआधीच शिंदे सरकारने अनेक योजनांचा पाऊस पाडला. आणि त्यांपैकी महत्वपूर्ण ठरलेली योजना म्हणजेच ‘लाडकी बहिण योजना’ होय. महिलांना केंद्रस्थानी ठेवून शिंदे सरकारने अनेक मोठमोठ्या योजनांची घोषणा केली आहे . त्यातीलच लाडकी बहीण योजना ही देखील एक महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र ठरलेल्या महिलांना महिन्याला १,५००/- रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता आणि त्याला सुरुवात ही झाली. जुलै २०२४ पासून या योजनेला सुरुवात झाली असून पात्र ठरलेल्या महिलांना, आत्तापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे ७,५००/ रुपये थेट त्यांच्या बँकेत जमा करण्यात आले आहेत.

दरम्यान काही दिवसांपुर्वीच विधानसभा निवडणुकांचा निकाल देखील समोर आला. आणि या निवडणुकीत लाडकी बहिण योजना ही महायुती सरकार साठी गेम चेंजर ठरली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला मतदार महायुती सरकारकडे आकर्षित झाल्याचे चित्र दिसून आले. तसेंच सरकारने सुद्धा या योजनेमुळेच महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतं मिळाली असल्याचे मान्य केले. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा महायुती सरकारने आधिच केली होती.

जाहीरनाम्या मध्ये महायुतीने लाडकी बहीण योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या १,५००/- रुपयांची रक्कम आमचे सरकार पुन्हा आल्यास ही रक्कम वाढवून २,१०० रुपये करू अशी ग्वाही त्यांनी दिली होती.(Ladki Bahin Yojana)

दरम्यान आता लाडकी बहिण योजनेअंतर्गत हा २,१००/- रुपयांचा हप्ता कधीपासून दिला जाणार ? असा प्रश्न महिला वर्गात उपस्थित होतोय. तर आजच्या या लेखात आपण सांगू इच्छितो की याची अंमलबजावणी ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर केली जाणार आहे.(Ladki Bahin Yojana)

पुढील वर्षी जो अर्थसंकल्प सादर होणार असेल, त्या अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद करण्यात येईल. त्यानंतर या योजनेच्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला २,१००/- रुपये दिले जातील.त्यामुळे साधारणता पुढील वर्षाच्या म्हणजेच एप्रिल २०२५ पासून याची अंमलबजावणी होऊ शकते.

तसेच मीडिया रिपोर्टने केलेल्या दाव्यानुसार २१ एप्रिल २०२५ पासून या २१००/- रुपयांचा हप्ता योजनेच्या पात्र महिलांना दिला जाईल. याचा अर्थ २०२४ डिसेंबर महिन्यात पात्र महिलांना फक्त १,५००/- रुपयेच मिळणार आहेत. एप्रिल महिन्यात म्हणजे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या योजनेच्या पात्र महिलांना २,१००/- रुपयांचा हप्ता देण्यास सुरुवात होऊ शकते.(Ladki Bahin Yojana)

अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाटसॲप ग्रुपचे सदस्य व्हा.   येथे क्लिक करा  

हेही वाचा  :- annasaheb patil loan Scheme : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना नेमकी आहे तरी काय ? कसा कराल अर्ज ?

SBI SO Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी भारतीय स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment