Ladki Bahin Yojana December Installment Date : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्यातील निधी मिळणार या तारखेला..
मागील काही दिवसांपासुन राज्यातील महिलावर्गात लाडकी बहीण योजनेच्या पुढील निधी बद्दल प्रश्न निर्माण होत होते. अशातच आता लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नागपूरमधिल विधानसभा परिषदेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देत्यावेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने बाबत एक मोठी घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महराष्ट्रातून भरगोस् प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना एकूण पाच हप्ते मिळालेले आहेत.(Ladki Bahin Yojana December Installment Date)
त्यांनतर आता ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ सहावा हप्ता कधी मिळणार ? असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना पडला आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे हे विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर दिले जातिल असं म्हटलं आहे. लाडकी बहीण योजना सुरु झाल्यावर राज्यसरकारने महिलांना दरमहा १,५००/- रुपयांचे निधी दिले होते. त्याप्रमाणेच आता पुन्हा ही योजना जोमाने सुरु होणार असून, डिसेंबर महिन्याचे १,५००/- रुपये देखिल महिलांच्या खात्यात पाठवले जाणार आहेत.
लाडकी बहीण योजनेने बद्दल कोणतीही शंका ठेऊ नका :
मी आज या निमित्ताने सभागृहाला आश्वस्त करु इच्छितो की, कोणतीही शंका मनात ठेवू नका, तसेंच आम्ही जी काही आश्वासने दिलेली आहेत. यासोबतच ज्या काही योजना आमच्या कडून राबवल्या गेल्या आहेत, त्यातील एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. आणि आमच्या ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, प्रतिसाद दिला. हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. तसेंच लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष अद्याप बदलले नाहीत.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :
योजना सुरु झाल्यावर काही जणांनी बँकेची अनेक खाती उघडल्याचे लक्षात आले, समाजात जशा चांगल्या प्रवृत्ती असतात , तशाच काही वाईट प्रवृत्ती देखील असतातच. एखादी योजना चुकीच्या पद्धतीनं वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची जबाबदारी आहे. तो योग्य प्रकारेच वापरला गेला पाहिजे. माणसांनीच नऊ बँक खाती काढलीत तर त्याला लाडकी बहीण कसं म्हणायचं, आणि लाडका भाऊ सुद्धा म्हणू शकत नाही. बहिणींच्या पैशांवर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसला ? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेंच शेतकऱ्यांच्या संदर्भात, युवकांच्या संदर्भात, ज्येष्ठांच्या संदर्भात आणि वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं देखील आम्ही पूर्ण करणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे यावेळी किती रुपये मिळणार :
महायुती सरकार कडून विधानसभा निवडणुकी दरम्यान प्रचार करत्यावेळी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आपले महायुती सरकार आल्यावर दरमहा २,१००/- रुपये देणार असे आश्वासन दिले होते. त्यानुसार महिलांना अर्थसंकल्पानंतर २,१००/- रुपयांप्रमाणं रक्कम मिळू शकेल. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वीच माहिती दिलेली. त्यामुळेच आता महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये १,५००/- रुपये मिळतील.(Ladki Bahin Yojana December Installment Date)
या तारखे पर्यंत मिळू शकतो पुढचा हप्ता
नागपूर येथे दिनांक १६ डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरु झालेले असून ते २१ डिसेंबर २०२४ रोजी हे अधिवेशन समाप्त होत आहे. म्हणजेच २२ डिसेंबर २०२४ नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थीं माहिलांना पुढील हफ्ता मिळू शकणार आहे.(Ladki Bahin Yojana December Installment Date)
व्हाट्सअप चॅनेल :- येथे क्लिक करा
हेही वाचा :
Pm Surya Ghar Yojana Helpline Number : अर्ज करायचा आहे ? या नंबरशी करा संपर्क !