Ladki Bahin Yojana Diwali Bonus : सध्या राज्यात एकाच योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा होतेय, ती म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.’ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या या योजनेला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला १,५०० रूपये जमा होऊ लागले आहेत, तसेंच ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून दर महिन्याला योजनेचा हप्ता सुरुवातीपासून जमा होत आहे. त्या महिलांच्या खात्यात सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ३,००० रूपये जमा केला होता. लाडक्या बहिणींसाठी भाऊबीज म्हणून हे पैसे सरकारने दिले होते.
त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकार महिलांच्या खात्यात ५,५०० रुपयांचा निधी दिवाळी बोनस म्हणून देण्याच्या विचारात असल्याची शक्यता आहे. तर मग हा निधी नेमका कोणत्या महिलांना मिळणार , कोणत्या महिला पात्र ठरणार आहे? जाणूंन घेऊयात आजच्या या लेखात.
Ladki Bahin Yojana Diwali Bonus
तसं पाहायला गेलं तर सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा व पाचव्या टप्प्यातील हप्त्याचे पैसे १० ऑक्टोबरपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केले होते. आणि त्यानुसार बऱ्याच महिलांच्या खात्यात ३,०००/- रूपये तसेंच ७,५००/- रूपये जमा झालेले. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा निधी आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून ३,०००/- रूपये जमा झाले होते. त्यांनतर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यामधील एकही रूपया जमा झाला नव्हता. अशा महिलांच्या खात्यात एकत्रितपणे ७,५००/- रूपयाचा निधी जमा झाला होता.
आता सणासुदीचे दिवस सुरु असल्यामुळे सरकार लाडक्या बहिणींसाठी दिवाळी गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु यावेळी सरकारकडून फक्त काही निवडक महिलांनाच अतिरिक्त २,५०० रुपये देणार असल्याचेही समोर आले आहे.(Ladki Bahin Yojana Diwali Bonus)
म्हणूनच चौथ्या हप्त्याचे ३,०००/- रूपये आणि २,५००/- रुपये असे एकत्रित करून महिलांच्या खात्यात ५,५००/- रुपये जमा होतील. आणि हेच पैसे दिवाळीचा बोनस म्हणून महिलांच्या खात्यात येणार आहेत. मात्र हा बोनस मिळवण्यासाठी देखील काही अटी असणार आहेत. त्या पूढील प्रमाणे आहेत.
या महिलांच्या खात्यात येणार बोनस :
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूची मध्ये त्या महिलेचे नाव असायला हवे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा तरी लाभ घेतलेला असणे.
लाभार्थी महिलेच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे.
अशा प्रकारच्या काही अटी असणार आहेत. आता ज्या महिला या अटीत बसत आहेत , त्यांना नक्कीच दिवाळी बोनस दिला जाईल.
अशाच नवनवीन अपडेट साठी प्रभात मराठीच्या व्हाट्सअप ग्रुपचे सदस्य व्हा.
येथे क्लिक करा: –whatsapp.com
हेही वाचा: – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी पर्यंत चालणार ?
महिलांसाठीची उद्योगिनी योजना म्हणजे नेमकी काय ?