Lek Ladki Yojana scheme 2024 :सरकार देणार मुलींना ₹75000 , असा करा अर्ज !

Lek Ladki Yojana scheme 2024 :आपल्याला माहिती असेलच की,  मुलींना शैक्षणिक क्षेत्रा करीता प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून  आर्थिक मदत मिळावी याकरिता वेळोवेळी अनेक योजना राबवण्यात येतात. याच प्रमाणे  महाराष्ट्र सरकार द्वारे आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. ज्या योजनेचे नाव ” महाराष्ट्र लेक लाडकी योजना” असे आहे . या योजने मुळे  आर्थिकदृष्ट्या  दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे आर्थिक मदत करण्यात येणार आहे.(Lek Ladki Yojana scheme)

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.  तर आजच्या या लेखात  महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 बद्दल  आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.  महाराष्ट्र लेक लाडकी योजना नक्की कशी असणार आहे ? योजनेचे वैशिष्टय, फायदे तसेच  त्याची पात्रता, उद्दिष्ट्ये तसेच  आवश्यक असणारी  कागदपत्रे आणि अर्ज करण्याची  प्रक्रिया इत्यादींची माहिती देणार आहोत. आम्ही आशा करतो की  ही सर्व माहिती तुमच्यासाठी  महत्त्वाची ठरेल. (Lek Ladki Yojana scheme)

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024

या योजनेची घोषणा 9 मार्च 2023 रोजी आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली होती.  या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या हतबल आणि गरीब कुटुंबातिल मुलींच्या शिक्षणाकरिता आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ही आर्थिक मदत मुलीच्या जन्मापासून ते तिचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत केली जाणार. (Lek Ladki Yojana scheme)

(Maharashtra Lek Ladki Yojana ) महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे दिली आहे. 

  • आधार कार्ड (मुलीच्या पालकांचे)
  • मुलीचे आधार कार्ड 
  • जन्म प्रमाणपत्र.
  • बँक खाते विवरण
  • रेशन कार्ड (पिवळे किंवा केशरी )
  • मूळ पत्ता पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • मुलगी आणि तिच्या पालकांचे पासपोर्ट
  • आकाराचे फोटो.
  • मोबाईल नंबर

महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 साठी असा करावा  अर्ज 

 महाराष्ट्र लेक लाडकी योजना ही महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या द्वारे 9 मार्च 2023 रोजी आर्थिक अर्थसंकल्प सादर करताना जाहीर करण्यात आली होती.  परंतु या योजनेतील अर्जाशी संबंधित सरकारने अद्याप या कसलीही माहिती शेअर केलेली नाही.  लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी व अर्ज करण्यास  तुम्हाला  स्वारस्य असल्यास,  आता अजुन काही काळ तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे .( Lek Ladki Yojana )

 महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2024 मध्ये येत्या काही दिवसांतच  ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी आम्ही आशा बाळगतो . अर्जाशी संबंधित कोणतीही माहिती राज्य सरकारकडून जाहीर झाल्यास. हा लेख अपडेट करण्यात येईल . तर  कृपया आमच्या प्रभात मराठी या वेबसाइटशी कनेक्ट रहा.

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment