Magel tyala Solar Pump Yojana Maharashtra : मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी घरबसल्या करा अर्ज !

Magel tyala Solar Pump Yojana Maharashtra : मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी घरबसल्या करता येणार अर्ज !
Magel tyala Solar Pump Yojana Maharashtra
Magel tyala Solar Pump Yojana Maharashtra

राज्यातील शेतकरी बांधवांना सिंचनाची सुलभ सुविधा उपलब्ध करून देणारी योजना गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहे. आणि ती योजना म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे राबवली जाणारी ‘ मागेल त्याला सौर कृषि पंप योजना.’ या योजनेबद्दल सविस्तर माहिती देणारा लेख आपण आधीच प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे या लेखात आपण काही ठराविक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ‘मागेल त्याला सौर कृषि पंप’ योजनेला बऱ्याच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. परंतु अजूनही बऱ्याच उमेदवारांना अर्जा बाबत अडचणी येत आहेत. त्यामुळेच अर्जदाराला आपल्या मोबाईल वरून घरबसल्या अर्ज करता यावा , याकरिता ही माहिती आम्ही प्रसिद्ध करित आहोत.

(Magel tyala Solar Pump Yojana Maharashtra)

योजना नेमकी काय आहे ?

तर मंडळी ज्या शेतकरी बांधवांकडे 2.5 एकर पर्यंत शेतजमीन आहे,अशा शेतकऱ्यांना 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचा सौर कृषि पंप मिळणार आहे. तर 2.51 ते 5 एकर शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 अश्वशक्तीचा तसेंच 9 एकर वरील शेतजमिन असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमता असलेला सौर कृषि पंप देण्यात येणार आहे.

स्वमालकीचे वैयक्तीक तसेंच सामुदायिक बोअरवेल, शेततळे, विहीर आणि बारा महिने पाणी असलेल्या नदीच्या शेजारी राहणारे शेतजमीनींचे मालक या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

राज्यातील ज्या शेतकरी बांधवांकडे एक शास्वत जलस्त्रोत आहे, ज्या शेत सिंचनासाठी पारंपारिक विजपुरवठा नाही अशा शेतकरी बांधवांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषि पंप योजना’ राबवण्यात येत आहे.

योजनेतून मिळणार फायदा :

Magel tyala Solar Pump Yojana Maharashtra

कृषिपंप सौर ऊर्जेवर चालणार असल्यामुळे वीज बिल येणार नाही.

शेतकरी बांधवांना सिंचनासाठी हक्काची आणि स्वतंत्र योजना असणार.

योजनेंतर्गत सर्वसाधारण गटातील शेतकरी बांधवांना केवळ 10% रक्कम भरून कृषी पंप खरेदी करता येणार.

अनुसूचित जाती/जमाती करिता लाभार्थी हिस्सा 5% भरावा लागेल आणि उर्वरित रक्कम ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनुदान रूपात देणार.

योजनेसाठी ऑनलाईन अर्ज पुढील वेबसाईट वरून करता येणार !

(Magel tyala Solar Pump Yojana Maharashtra)

अर्ज करण्याकरिता ऑनलाईन वेबसाईट तयार करण्यात आली आहे , तिथून तुम्हाला आपला अर्ज सादर करता येणार आहे. अगदी घरबसल्या.

अर्ज करण्यासाठी क्लिक करा :- mahadiscom.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा GR :-MTSKPY GR_mr.फप

शासनाच्या इतर योजना :- 

सूर्यघर योजनेच्या अर्जांना मिळाली मान्यता !

शेतमाल वाहतूकीसाठी मिळणार 2 लाखाचे अनुदान !

ड्रोन दीदी योजना म्हणजे नक्की काय ? वाचा सविस्तर माहिती इथे

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment