Mahadbt Tractor Subsidy: महाडीबीटी ट्रॅक्टर योजना 2024 !
Mahadbt Tractor Subsidy: शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकार विविध प्रकारच्या योजना सक्रिय पद्धतीने गेल्या काही वर्षांपासून राबवत आहे . राज्यातील गरजू शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण शेतातील उपकरणे सहजरीत्या उपलब्ध व्हावीत याकरिता राज्य सरकारने विविध प्रकारचे उपक्रम सुरू केले आहेत. शेती करण्यासाठी काही शेती उपकरणे महत्त्वाची असतात. सरकार द्वारे शेतकऱ्यांना ही उपकरणे उपलब्ध व्हावीत यासाठी सरकारने विविध प्रकारच्या यंत्रसामग्री तसेंच उपकरणांकरिता सबसिडीची पध्दत सुरू केली आहे. विशेष करून महा.डीबीटी ट्रॅक्टर योजना सबसिडी 2024 ही योजना शेतकऱ्यांना परवडेल अशा किमतीत मशीन खरेदी करण्यास सक्षम बनवण्याचे काम करेल या उद्देशाने आखण्यात आली आहे.Mahadbt Tractor Subsidy
ट्रॅक्टर हे शेतिकरिता लागणारे आवश्यक असे साधन आहे. जे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात प्रभावीपणे मशागत करण्यास मदत करते. शेतकऱ्यांना हे ट्रॅक्टर सहजरित्या उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकार महाडीबीटी ट्रॅक्टर योजना सबसिडी 2024 या माध्यमातून विविध प्रकारचे अनुदान देण्याचे ठरवले आहे.Mahadbt Tractor Subsidy
- महाडीबीटी ट्रॅक्टर योजना :
शेतकऱ्यांना शेती करणे सोपे जावे यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या द्वारे शेतकऱ्यांना महाडीबीटी कृषी उपकरणांसाठी अनुदान दिले जाते आहे . नुकताच या योजने मध्ये सरकारकडून मोठा बदल देखील करण्यात आलेला आहे . काही यंत्रांच्या खरेदीच्या अनुदानात सरकारकडून तब्बल तिप्पट वाढ करण्यात आलेली आहे. ज्यात ट्रॅक्टर, पॉवर टिलर अशा यंत्रांचा समावेश आहे. महाडीबीटी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता ;
2024 मध्ये महाडीबीटी सबसिडीद्वारे ट्रॅक्टरचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांकडे स्वयं-शेतीसाठी योग्य जमीन असणे गरजेचे आहे.
यासोबतच सर्व अर्जदारांनी त्यांच्या जमिनीच्या आणि शेतीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे जवळ असणे आवश्यक आहे.
शेतकरी हा महाराष्ट्राचा नागरिक तसेंच कायमचा रहिवासी असायला हवा.
अर्जदाराला याआधी कृषी अनुदान योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी कोणतेही फायदे किंवा अनुदान मिळालेले नसावे.
अर्जदाराचे वय 18 ते 60 या दरम्यान असावे.
तसेच अर्जदाराचे वर्गीकरण अल्प किंवा अत्यल्प शेतकरी असे असायला पाहिजे.
महाडीबीटी ट्रॅक्टर योजना अंतर्गत अनुदान किती ?
महाडीबीटीचा वापर करुन शेतकऱ्यांनी या अनुदानासाठी ऑनलाइन साइनअप करावे लागेल. महाडिबिटी द्वारे ट्रॅक्टरसाठी 5 लाख रुपये, पॉवर ट्रेलरसाठी 1 लाख 20,000 रुपये तसेंच हार्वेस्टरसाठी 8 लाख रुपये इतके अनुदान दिले जात आहे.Mahadbt Tractor Subsidy
योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. मोबाईलवर ते शक्य होत नसल्यास CSC केंद्र किंवा सरकार सेवा केंद्राला जाऊन भेट देऊ शकता. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कापणी यंत्र, नांगर, मल्चिंग मशीन, मळणी यंत्र, पॉवर ट्रेलर, रोटाव्हेटर आणि कुट्टी मशीन यासारख्या विविध कृषी यंत्रांवर अनुदान दिले जात आहे. अनुदानाची रक्कम ही सामान्य श्रेणीत बसणाऱ्या शेतकऱ्यांना उपकरणाच्या किंमतीच्या 40% पर्यंत तसेंच मागास वर्गातील किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांसाठी 50% इतकी आहे.
- महाडीबीटी ट्रॅक्टर योजनासाठी आवश्यक कागतपत्रे :
आधार कार्ड
रहिवाशी दाखला
लाईट बिल
जातीचा दाखला
7/12 दाखला
प्रतीज्ञा पत्र
8 अ दाखला
मोबाईल नंबर
Mahadbt Tractor Subsidy
- योजनाचे उद्दिष्ट ?
राज्यातील शेतकऱ्यांना ५० टक्के पर्यंत अनुदान मिळवून देणे - शेतीकामासाठी ट्रॅक्टर खरेदीकरिता 1 लाख रुपये मंजूरी.
- शेतकऱ्याचे उत्त्पन्न वाढावे.
- शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा.
- राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे.
- शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा.
- तसेच शेतातील मेहनतीच्या कामांना गती मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
(महाडीबीटी वेबसाईटवर अपडेट पहा)
हेही वाचा: Well Subsidy Scheme: शेतकऱ्यांना विहीर खोद्ण्यासाठी मिळणार 3 लाखांचे अनुदान!
Bakri Palan Loan Apply: पालनासाठी मिळणार 50लाखांचे अनुदान.