Maharashtra Latest Weather Updates: जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती…

Maharashtra Latest Weather Updates : जाणून घ्या राज्यातील पावसाची स्थिती !

विदर्भात आजपासून पावसाचा काहीसा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर मराठवाड्यात येत्या दोन दिवसात किंवा ६ जुलैपासून पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भा मध्ये कालपासूनच काहीप्रमाणात पाऊस झाला असून येत्या 2 दिवसात आणखी जोर वाढण्याची शक्यता आहे.(Maharashtra Latest Weather Updates)

मान्सूनने देश काबीज केल्यामुळे देश मध्यावरचा पुर्वो-पश्चिमी मुख्य मान्सूनी आस सरासरी जागेवर तसेच अरबी समुद्रातील पश्चिम किनारपट्टीसमोरील दक्षिणोत्तर तटीय आस, स्थापित झाले आहे. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये सुद्धा फक्त मराठवाडा वगळता आज शुक्रवार दि. ५ जुलै पासून पुढील पाच दिवस एमजेओ व मान्सूनच्या तसेच तटीय अशा दोन्हीही आसामुळे मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता जाणवते आहे.

Maharashtra Latest Weather Updates

इतर राज्यात म्हणजेच उत्तर प्रदेशसह पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि आसामकडील ७ राज्या मध्ये येत्या १० जुलैपर्यंत अतिजोरदार ते अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे.

महाराष्ट्रात ५ दिवसांतील पावसाची तीव्रता?

मध्य महाराष्ट्रात – गेल्या १० दिवसापासूनच हलक्या का होईना पण होत असलेल्या डांगी पावसाचा जोर, धुळे, नंदुरबार, जळगांव जिल्ह्यांत व पेठ, सुरगाणा, सटाणा, कळवण, देवळा, मालेगांव, तालुक्यात अजूनही कायम आहे. मात्र रविवार दि. ७ जुलैपासून ह्या पावसाचा जोर काहीसा कमी होत असला तरी इतर प्रणाल्यातून तेथे मध्यम पावसाची शक्यता ही कायम असेल .

पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत तसेच दक्षिण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव व चांदवड तालुक्यात आज शुक्रवार दि. ५ जुलै पासून पुढील पाच दिवस मध्यम ते जोरदार सरी बरसण्याची चांगलीच शक्यता आहे.

Maharashtra Latest Weather Updates
Maharashtra Latest Weather Updates

मराठवाडा – मराठवाड्यात उद्यापासून १० जुलैपर्यंतच्या पाच दिवसांत मात्र जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, धाराशिव व लातूर जिल्ह्यांत मध्यम तर छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यांत किरकोळच पावसाची शक्यता जाणवते.

तर कोकण आणि विदर्भ -कोकण , विदर्भात जोरदार पाऊस जरी टिकून असला तरी वातावरणीय प्रणाल्याच्या प्रमाणात अपेक्षित अतिजोरदार पाऊस अलीकडे तेथे जाणवत नाहीये. तसेंच विदर्भात सुद्धा मध्यम पाऊस जाणवत आहे. त्यामुळे येत्या पाच दिवसांत ह्या ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग , नागपूर ,अमरावती, भंडारा आणि गोंदिया ह्या जिल्ह्यांत सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातून सह्याद्रीवर चढलेला मान्सूनची घाटमाथ्यावर देखील सक्रियता वाढलेली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील धरण क्षेत्रांत आवक वाढून जल साठवण टक्केवारीच्या मापनास सुरवात देखिल केली जाऊ शकते.

हेही वाचा :

‘माझी लाडकी बहीण योजना 2024 Online Apply : घरबसल्या मोबाईल वर अर्ज कसा करावा ? जाणून घ्या इथ

mahatma jyotirao phule jan arogya yojana : 2024 मध्ये डेंटल उपचारांचा देखील समावेश करण्याची मागणी..

Free Boring Yojana : 2024 सरकार कडून शेतकऱ्यांना मिळणार

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment