mahatma jyotirao phule jan arogya yojana : 2024 मध्ये डेंटल उपचारांचा देखील समावेश करण्याची मागणी..

mahatma jyotirao phule jan arogya yojana :डेंटल उपचारांचा देखील समावेश करण्याची मागणी..

महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन सुरू होऊन काहीच दिवस लोटले आहेत. तसेंच लक्षवेधीच्या माध्यमांतून आमदार सत्यजीत तांबे यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत डेंटल उपचारांचा देखील समावेश करण्याची मागणी केली आहे . आणि आमदार सत्यजीत तांबेंची मागणी परिषदेत लक्षात घेता, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी या योजनेत डेंटल उपचारांचा देखील समावेश करण्याचे आश्वासन दिले आहे. आरोग्य योजनेचा लाभ घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रुग्णालये बोगस रुग्ण दाखवून योजनेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात या सगळ्यावर सरकार कशाप्रकारे आळा घालणार, असा सवाल आमदार सत्यजीत तांबे द्वारे सभागृहात उपस्थित करण्यात आला . तर नुकतीच झालेल्या विधान परिषदेच्या बैठकीत राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी महात्मा जोतिबा फुले जन आयोग्य योजनेत डेंटल उपचारांचा देखील समावेश करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.आमदार सत्यजित तांबे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत असे म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेत १००० रुग्णालयांचा समावेश झाला आहे . तसेंच या योजनेचा लाभ दीड लाखांपासून ५ लाख रुपयांपर्यंत करण्यात आला आहे. या योजनेत पूर्वी १,३५६ उपचारांचा समावेश होता. मात्र आता यामध्ये डेंटल उपचारांचा देखील समावेश करण्यात आला आहे. तसेच ज्या १३७ तालुक्यांमध्ये रुग्णालये नाहीत त्या ठिकाणी लवकरच रुग्णालये सुरू करण्यात येण्याचे आश्वासन देण्यात आले आहेत .

Mahatma phule jan arogya yojana
Mahatma phule jan arogya yojana

राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर त्यांनी ही योजना पाच लाखांपर्यंत करण्यात आली आहे. परंतु यातले १.५ लाख इन्शुरन्स कंपनी देणार असून , ३.५ लाख सरकार कडून दिले जाणार आहेत. ३.५ लाख सरकार कसे देणार, स्कॉलरशिपच्या बाबतीत झालेली फसवणूक (mahatma jyotirao phule jan arogya yojana )आरोग्य योजनेच्या बाबतीत झाली तर ही योजना फसवी योजना होऊ शकते. त्यामुळे लाभार्थींना पूर्ण पाच लाख रुपये सरकार इन्शुरन्स कंपनी मार्फत देणार का? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने कोणत्याही प्रकाराच्या अटींचे निर्बंध घातले नाहीत. गरिबातल्या गरीब आणि श्रीमंत अशा सगळ्यांना मिळवून दिला. राज्यातील १३ कोटी नागरिकांचा या योजनेत सहभागी होणार आहे.

हेही वाचा :

MJPJAY GR : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना , नवीन निधी मंजूर !

India Post Recruitment 2024: GDS पदांसाठी 35 हजार जागांसाठी मेगा भरती सुरु

Mazhi ladki bahin yojna 2024 Online Apply ; महिलांना मिळणार १,५०० रुपये जाणून घ्या अधिक माहिती

 

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment