Mahindra Diwali Offer 2024 : महिंद्रा देतंय ग्राहकांसाठी खास ऑफर , वाहन खरेदीवर लाखोंची सुट !

Mahindra Diwali Offer 2024 : महिंद्रा देतंय ग्राहकांसाठी खास ऑफर , वाहन खरेदीवर लाखोंची सुट !

भारतात सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. आणि अशातच महिंद्राने कंपनी आपल्या शक्तिशाली बोलेरो निओवर मोठ्या प्रमाणात सवलत देत आहे. तर मंडळी तुम्ही सुद्धा सणासुदीच्या दिवसात गाडी घरी आणण्याचा विचार करित आहात , तर या महिन्यात तुम्ही महिंद्रा कंपनीची कार खरेदी करून चांगल्या प्रकारे सवलत मिळवू शकता. महिंद्रा सारखी नामांकित कंपनी आपल्या काही मॉडेल्सवर 1.24 लाख रुपयांपर्यंतची सवलत देत आहे.

ही सवलत अशा प्रकारे असणार आहे ,की यामध्ये रोख सवलत तर आहेच यासोबतच एक्सचेंज बोनस, एक्सचेंज ऑफर, ॲक्सेसरीज आणि कॉर्पोरेट सूट इत्यादींचा समावेश देखील असणार आहे.

तर मॉडेलच्या काही विशिष्ट व्हेरिएंटवर अवलंबून एकूण सूट रक्कम सुद्धा बदलू शकते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही ऑफर केवळ या महिन्याच्या अखेरपर्यंतच असणार आहे.त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी कार घेण्याच्या विचारात असेल तर, हा लेख त्यांच्या पर्यंत नक्की पोहचवा. चला तर मग जाणून घेऊयात गाडी बद्दल अधिक आणि सविस्तर माहिती.

महिंद्रा बोलेरो या गाडीवर मिळणार 1.03 लाख रुपयांची सूट !

तसें पाहायला गेले तर महिंद्रा बोलेरोची किंमत ही 9.79 लाख ते 10.91 लाख रुपये पर्यंत आहे. त्याच्या बेस B4 आणि ब6 या व्हेरिएंटवर या महिन्यात आकर्षक ऑफर देण्यात येत आहेत. ज्यामध्ये 30,000 रुपयांची सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट ऑफरचा समावेश करण्यात आला आहे.

कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त 10,000 रुपयांच्या ॲक्सेसरीजचा आनंद घेता येऊ शकतो. तसेंच त्याच्या टॉप B6 Opt व्हेरिएंटवर . 90,700 रुपये ची रोख सूट दिली जात आहे. तर 10,000 चे एक्सचेंज बोनस व 3,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर देखील आहे. तर एकूणच या गाडीवर 1.03 लाख रुपयांची सूट देण्यात येत आहे.

हेही वाचा: –  दिवाळी मध्ये कार खरेदी करायची आहे ? बँकेकडून 10 लाख रुपये कार लोन केल्यावर किती येईल ईएमआय?

Ratan Tata Car Collection : या होत्या रतन टाटा यांच्या आवडत्या गाड्या !

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment