Mahindra Electric Car : नोव्हेंबर महिन्यात महिंद्राच्या या कार वर मिळतेय 3 लाख रुपयांपर्यंतची सूट !
भारतातील अग्रगण्य आणि सर्वोत्कृष्ठ कार उद्योग क्षेत्रामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनीचे मोठे नाव आहे. महिंद्रा कंपनी कारच नाही तर व्यावसायिक वाहने देखील मोठ्या प्रमाणात उत्पादित करत असते.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या कारचे अनेक मॉडेल्स ग्राहकांमध्ये बरेच लोकप्रिय आहेत. दरम्यान या नोव्हेंबर महिन्यात महिंद्राची इलेक्ट्रिक कार विकत घेणाऱ्यासाठी कंपमी विशेष ऑफर देत आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांच्या XUV400 या इलेक्ट्रिक एसयूव्ही कारवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.
या कारवर कंपनीने ३ लाख रुपयापर्यंतची सूट देण्याचे ठरवले असून कॅश डिस्काउंट तसेच ॲक्सेसरीज, बोनस, कार्पोरेट सूट व इतर व्हेरिएटचे फायदे सुद्धा मिळण्याची शक्यता आहे.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन?
महिंद्राचे जे काही नवीन पीआरओ व्हेरियंट आहे ते EC PRO आणि EL PRO व्हेरियंटच्या नावाने लॉन्च करण्यात आले असून या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये अपडेटेड डॅशबोर्ड, विविध नवनवीन फीचर्स तसेच ड्युअल टोन थीम यासोबतच आधि पेक्षा जास्त तंत्रज्ञानाने ही कार सुसज्ज झाली आहे. कारमधील जुना डॅशबोर्ड आणि क्लायमेट कंट्रोल पॅनल होता, तो सध्या डिझाईन करून अपडेटेड करण्यात आलेला आहे. तसेंच डॅशबोर्डच्या पॅसेंजर बाजूस आता स्टोरेज दिला नसून त्या जागी पियानो ब्लॅक इन्सर्ट देण्यात आलेला आहे. XUV700 सारखेच स्टेरिंग व्हील देण्यात आले असून, केबिनमध्ये देखील बरेच नवनवीन फिचर्स देण्यात आले आहेत.
कार मधील इतर काही महत्वाची वैशिष्ट्ये ?
Mahindra Electric Car
महिंद्राच्या या कारमध्ये ड्युअल झोन एसी, टाईप सी यूएसबी चार्जर तसेंच मागच्या बाजूला नवीन एसी व्हेंट्स बसवण्यात आलेले आहेत. इतकेच नाही तर, वायरलेस फोन चार्जिंग, सनरूफ, पुश बटन स्टार्ट- स्टॉप व उंची ॲडजस्ट करता येईल अशी ड्रायव्हर सीट करिता सुविधा देखिल देण्यात आली आहे.
त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर, ६ एअर बॅग, रिव्हर्स कॅमेरा यासोबतच टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यासारखी वैशिष्ट्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
पहिला बॅटरी पॅक हा 34.5 kWh रेंज 375 किलोमीटर देणारा बसवण्यात आलेला आहे. आणि दुसरा बॅटरी पॅक हा 39.4 kWh क्षमतेचा आहे ज्याची रेंज 456 किलोमीटर असणारा आहे.(Mahindra Electric Car)
हेही वाचा : Auto Hold In Car : जाणून घ्या कार मधील Auto Hold Function म्हणजे काय ? आणि कसे काम करते.
कार खरेदी करायची आहे ? बँकेकडून 10 लाख रुपये कार लोन केल्यावर किती येईल ईएमआय?