Milk Business Profit : सोलापूर मधील हा शेतकरी दूध उत्पादनातुन वर्षाकाठी करतो 22 लाखांची उलाढाल !

Milk Business Profit : सोलापूर मधील हा शेतकरी दूध उत्पादनातुन वर्षाकाठी करतो 22 लाखांची उलाढाल !
Milk Business Profit
Milk Business Profit

भारतात फार आधीपासूनच शेती सोबत जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय केले जातात. त्यापैकीच एक सर्वाधिक प्रमाणात केला जाणारा जोडधंदा म्हणजे पशुपालन. अलीकडच्या काळात पशुपालनासोबतच शेळीपालनाकडे सुद्धा व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. कुक्कुटपालन व्यवसायाला देखील मोठ्या प्रमाणात गती मिळते आहे.(Milk Business Profit)

कृषी क्षेत्रात गेल्या काही काळापासून ज्याप्रमाणे तंत्रज्ञान येऊ घातले आहे. अगदी त्याचप्रमाणे पशुपालन शेळीपालन अशा व्यवसायात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा शिरकाव होतो आहे. आणि यामुळे जातीवंत गाई- म्हशीच्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. यामुळे दुधाचे वाढीव उत्पादन मिळवणे शेतकऱ्यांना सोप्पे झाले आहे.

तर याच पद्धतीचा वापर करून सोलापूर जिल्ह्यामधील शेतकरी महादेव रंदुरे आपल्या व्यवसायातून चांगला नफा मिळवत आहेत.(Milk Business Profit)
महादेव रंदुरे यांनी गायीच्या एचएफ जातीचा पूर्णपणे अभ्यास केला आणि तिचे आर्थिक गणित समजून घेत , गायीच्या पालनास सुरुवात केली. आणि आज रोजी त्यांच्या गाई पालनाच्या व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. तर ते आता केवळ दूध विक्रीतूनच 22 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.(Milk Business Profit )

सोलापूर जिल्ह्यातिल मोहोळ तालुक्यात कोरवली गाव असून या गावात महादेव रंदुरे यांचे नातेवाईक राहिला आहेत. त्यांच्याकडूनच महादेव रंदुरे यांनी सुरुवातीला एक गाय विकत घेतली. यावेळी महादेव रंदुरे यांची परिस्थिती तशी चांगली नव्हते, ते उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याच्या शेतात मंजूरी करत होते. मात्र त्यांनी केवळ एका गायीच्या साह्याने गायपालनाला सुरुवात केली. आणि पुढे कालांतराने त्यांनी एचएफ जातीची गाय विकत आणली आणि हळूहळू त्यांच्या गाईंच्या संख्येत वाढ करित आपला स्वतःचा दुधाचा व्यवसाय सुरु केली.

सध्या त्यांच्याकडे एकूण 17 एचएफ जातीच्या गायी आहेत. तर याच गाईंच्या माध्यमातून त्यांना दररोज 200 ते 250 लिटर दुधाचे उत्पादन मिळत आहे. त्याचे कारण असे की, या जातीच्या गाई या प्रामुख्याने पाश्चात्य देशातील म्हणजेच फ्रान्स, आइसलँड व नेदरलँड इथल्या असून देशी गाई पेक्षा एचएफ जातीच्या गायींची वार्षिक दूध उत्पादनाची क्षमता अधिक असते. यासोबतच गाईची एचएफ जात ही जगातील सर्वाधिक दूध देणाऱ्या जातींपैकी एक असून ही जगातील एकमेव अशी जात आहे जिच्या बैलामध्ये इतके वीर्य असते की ज्यापासून फक्त वासरे जन्माला येतात. जर या जातीच्या गाईंची दूध उत्पादन क्षमता पाहिली तर ती गाईच्या जातीच्या दर्जावर अवलंबून असते. तरी साधारणपणे एक गाय दररोज 15 लिटर पासून ते 70 लिटर पर्यंत दूध देऊ शकते.एका वेतात याच्यात जातीच्या गाई पाच हजार सहाशे ते दहा हजार लिटर पर्यंत दूध देतात.()

महादेव रंदुरे केवळ दुधाची विक्रीच करित नाहीत तर, त्या दुधापासूनच ते खवा, तूप, दही, पनीर यांसारखे पदार्थ बनवतात आणि घरगुती पातळीवरच बनवून पुन्हा विक्री देखील करतात. महादेव रंदुरे यांच्या म्हणण्यानुसार सध्या ते दूध विक्रीतून वर्षाला 22 लाखांची उलाढाल करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामामुळे आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळाली आहे.

अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रभात मराठीच्या व्हाट्सॲप ग्रुपचे सदस्य व्हा.

येथे क्लिक करा :-whatsapp.com

हेही वाचा: – मका आणि लसणासाठी वापरा हे वाण आणि मिळवा भरगोस उत्पादन..

ॲग्रीस्टेक योजना नेमकी आहे तरी काय ? त्याचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ? वाचा सविस्तर माहिती इथे..

WhatsApp and Telegram Button Code
WhatsApp Group Join Now
Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment